शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

अमृत आहार गैरप्रकार :सर्व संबधीत घटकांवर जबाबदारी निश्चित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:23 IST

अमृत आहारमधील गैरप्रकार प्राथमिक स्तरावर महिला व बालविकास विभागानेही मान्य केल्यानेच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश दिले आहेत. ती चौकशी झालीच पाहिजे. -लतिका राजपूत

संडे स्पेशल मुलाखत

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कलॅाकडाऊनमध्ये जनतेला गावोगावी रेशनचे मोफत धान्य पोहचू शकते तर अंगणवाडी सेविकांना अमृत आहारचा पुरवठा का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील ठेकेदार तयार असतांना थेट पुण्याचा ठेकेदार नेमण्याची गरज काय? आहार पुरवठ्यात झालेल्या दिरंगाईची आणि गैरप्रकाराची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी व कुणा एकावर नव्हे तर त्यातील संबधीत सर्व घटकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी आमची आजही मागणी कायम असल्याचे हा गैरप्रकार उघड करणारे व नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्या तसेच जिल्हा व राज्य गाभा समितीच्या अशासकीय सदस्या लतिका राजपूत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले. 

योजनेतील गैरप्रकार आपल्या कशा लक्षात आला?लॅाकडाऊनच्या काळात अर्थात एप्रिल व मे महिन्यात अमृत आहार मिळतो का? म्हणून सहज चौकशी केली, तर अनेक ठिकाणी तो उपलब्ध झाला नसल्याचे दिसून आले. २१ मे रोजी गाभा समितीच्या राज्य बैठकीत हा मुद्दा मांडला. तेथे वाटप सुरू असल्याचा दावा करण्यात आला. पुन्हा तपासणी केली परंतु तोच प्रकार दिसून आला. त्यानंतर जून महिन्यात ब्लाॉक लेव्हलचा बैठका झाल्या त्यावेळी वाटपाचे नियोजन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माल कुठून येतो आहे विचारणा केली तर खालून वरपर्यंत सर्वांचे एकच उत्तर वरून येत आहे एवढेच होते. त्यानंतर खोलात जाऊन तपास केला असता पुणे येथील ठेकेदार असल्याचे स्पष्ट झाले आणि गौडबंगाल समोर आले. मिडियानेही यासंदर्भात वृत्त प्रकाशीत केले. २४५ अंगणवाडीव्यतिरिक्त इतर कुठल्याही अंगणवाडीत आहार पुरवठा झाला नव्हता हे सिद्ध झाले आहे. आता त्यातील गैरप्रकार बाहेर निघावे हीच आमची मागणी आहे. 

दोन्ही समितींकडून मवाळपणा का? जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमली त्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी नेमले गेले. जिल्हा परिषदेचा गैरप्रकार जिल्हा परिषदेचे अधिकार करणार तर तो चौकशी अहवाल कसा राहील हे स्पष्टच आहे आणि झालेही तसेच. नंतर नेमलेल्या समितीनेही दुर्गम भागातील अंगणवाडींमध्ये चौकशी न करता सपाटीवरील भागातील अंगणवाडीची चौकशी करून अहवाल सादर केला. आता राज्य स्तरावरूनच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याने सर्व काही स्पष्ट होईल.पुढची भुमिका काय?या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहेच, परंतु दोन महिने आहार पोहचला नाही. लाभार्थी लाभापासून वंचीत राहिले. या सर्वांची आता निपक्षपातीपणे चौकशी होईल तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत.