शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षानंतर फसवणुकीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सनशाईन हायटेक इन्फ्राकॉन लिमिटेड या दामदुप्पट करून देणाऱ्या कंपनीने नंदुरबार व नवापूर तालुक्यातील गुंतवणूकदारांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सनशाईन हायटेक इन्फ्राकॉन लिमिटेड या दामदुप्पट करून देणाऱ्या कंपनीने नंदुरबार व नवापूर तालुक्यातील गुंतवणूकदारांची अडीच कोटी रुपयांपेक्षा अधीकची रक्कम लुबाडली आहे. कंपनीचे आॅफीस बंद होऊन तीन ते चार वर्ष होऊनही अद्याप संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हती, मात्र १६ गुंतवणुकदारांनी तक्रार अर्ज केल्याने आता लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.गुंतवणुकीवर दामदुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली सनशाईन हायटेक इन्फ्राकॉन लिमिटेड कंपनीने नागरिकांना अमिष दाखविले होते. कंपनीने २०१२ मध्येये नंदुरबारात जीटीपी कॉलेज रोडला कार्यालय देखील थाटले होते. गावोगावी सभा घेवून कमी कालावधीत दाम दुप्पटीचे अमिष दाखविले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी कंपनीत एजंटांच्या माध्यमातून पैसे गुंतविले होते. ती रक्कम तब्बल अडीच कोटींपेक्षा अधीक आहे. २०१५ मध्ये कंपनीने नंदुरबार येथील कार्यालय अचानक बंद केले. एकाही ठेवीदाराची रक्कम परत केली नाही. कंपनीला तोटा आल्याने कंपनी बंद पडल्याचे सांगण्यात आले. कंपनीकडील मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत केले जातील असे आश्वासन मॅनेजर वसंत बिºहाडे व जितेंद्र बिºहाडे यांनी दिले होते.दरम्यान, १० दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या गडचिरोली जिल्ह्यातील ठेवीदारांच्या तक्रारींवरून कंपनीचे संचालक रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा.झाबुआ व किसनलाल बसराम मेरावत, रा.राजस्थान यांना अटक करण्यात आली. तेथील तपासी अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार तालुक्यातील ठेवीदारांनी देखील पोलीस अधीक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.नंदुरबार व नवापूर तालुक्यातील १६ ठेवीदारांची तब्बल अडीच कोटींपेक्षा अधीकची रक्कमेबाबत तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेता ठेवीदारांना न्याय मिळावा अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे ठेवीदारांनी केली आहे.जिल्ह्यात काही वर्षात दामदुप्पटच्या नावाखाली अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. असे असतांनाही अनेक कंपन्या येतात, अमिष दाखवून लोकांना फसवून निघून जातात. याबाबत दक्षता घेणे आवश्यक असतांना तसे होतांना दिसून येत नाही.