शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात रुग्ण आढळल्याने उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गणेशनगर भागातील २९ वर्षीय नागरिकांचा कोरोना विषाणू बाधीत अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील गणेशनगर भागातील २९ वर्षीय नागरिकांचा कोरोना विषाणू बाधीत अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील व अति संपर्कातील आठ व्यक्तींना विलगीकृत करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. नवीन प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी आठ वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रांत अधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.गणेश नगर भागात राहणाऱ्या २९ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, मंडळ अधिकारी प्रमोद अमृतकर यांनी तत्काळ गणेश नगर भागात भेट देऊन बाधित रूग्णाच्या कुटुंबातील व अति संपर्कातील आठ व्यक्तींना सोमवारी रात्री विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यांचे नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. गणेश नगर भागात बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी कंटेनमेंट व बफर झोननिर्मिती केली आहे.प्रतिबंधात्मक क्षेत्र परिसरात गणेश नगर, शनिमंदीर परिसर, भरत नगर या वसाहतींचा समावेश असून, बफर झोनमध्ये ब्रम्हसृष्टी कॉलनी, स्वामी समर्थ मंदीर परिसर, मोहीदा चौफुली परिसर, कल्पना नगर, शंकर विहार, कुबेर नगर, पटेल रेसीडेंन्सी परिसर, बस स्थानक, स्टेट बँक चौक व परिसर, दोंडाईचा रोड प्रवेशव्दारा पर्यंतचा परिसर, चार रस्ता पाण्याची टाकी परिसर, प्रेस मारूती मंदीर परिसर, भाजी मार्केट परिसर, साईबाबा नगर, रामदेवबाबा नगर, डोंगरगांवरोड परिसर या भागाचा समावेश करण्यात आला आहे कंटेनमेंट झोनमध्ये असणाºया वसाहतीतील नागरिकांची सलग १४ दिवस आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, यासाठी आठ वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, सोमवारी गणेश नगर परिसरातील एका व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर काही व्यक्ती संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीय व व्यक्तीच्या नावाचा उल्लेख सामाजिक माध्यमातून अर्थात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे करत आहेत, असे प्रशासनाच्या निदर्शनास येत आहे. यासंदर्भात मंगळवारी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक शहादा यांना पत्र दिले आहे. जर कोणी रूग्ण अथवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाचा उल्लेख अथवा ओळख पटेल असा मजकूर सामाजिक माध्यमाद्वारे करत असतील त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी यांनी दिला आहे.