शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

खैरवे धरणातून नेसू नदीत पाण्याचे आवर्तन सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

नवापूर तालुक्यातील पाच ते सहा गावात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्यासाठी काही भागात महिलांना भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या ...

नवापूर तालुक्यातील पाच ते सहा गावात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्यासाठी काही भागात महिलांना भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याचीही परिस्थिती अवघड आहे. पशुधन कसे वाचवावे, हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. दैनंदिन वापरासाठी मोठी अडचण भासू लागली आहे. बागायती भागातील विहिरी, विंधन विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. जिरायती भागात पाण्याची अडचण आहे. नवापूर तालुक्यातील अनेक गावातील पीकही करपू लागले आहे. खैरवे धरणातून पाणी सोडल्याने अनेक विहिरी बोअरवेल हातपंप यांचा पाणीसाठा वाढतो. आदिवासी ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळतो.

या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून खैरवे धरणातून ताबडतोब पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे व नागरिकांना पिण्याचे पाणी तत्काळ द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून तत्काळ निर्णय घेऊन पिण्यासाठी पाणी द्यावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.

उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करावे

खैरवे धरणातून ताबडतोब पाणी सोडावे शेतकरी, ग्रामस्थ, महिला पाण्यापासून वंचित आहेत. गुराढोरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवापूर तालुक्यातील देवमोगरा, निजामपूर, पालीपाडा, शेही शेती, बहुतांश गावे ही खैरवे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. धरणातून पाणी सोडावे, यासाठी दरवर्षी निवेदन द्यावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पाहून तत्काळ पाणी सोडण्याचे नियोजन करावे.

- महेंद्र वळवी, सामाजिक कार्यकर्ते, शेही