शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- शेतकऱ्यांच्या वास्तव प्रश्नांचा अभ्यास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:48 IST

शेतकऱ्यांसाठी आजवर विविध कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी त्या त्या पातळीवर सोयीनुसार होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार झाला पाहिजे. - कृषी अभ्यासक ईश्वर भूता पाटील

रमाकांत पाटील    लोकमत न्यूज नेटवर्कस्वातंत्र्यानंतर देशात शेतकऱ्यांसाठी महत्वाचे कायदे झालेले नाहीत. जे कायदे झाले आहेत त्याचीही अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. जो तो सोयीच्या पद्धतीने कायद्यांचा वापर करीत आहे. त्यामुळे नवीन कायद्यातील ज्या बाबी आहेत त्याचा आजही कायदा नसतांना वापर सुरू आहे. आजही शेतकरी अनेक ठिकाणी बाहेर व्यापा-यांना माल विक्री करीत आहे. अनेक ठिकाणी खेडा खरेदी सुरू आहे. असे अनेक उदाहरणे देता  येतील. म्हणून शेतक-यांचे वास्तव प्रश्नांवर अभ्यास करून शेतक-यांचा सर्वांगीण हिताचा व्यापक कायदा करण्याची गरज आहे. असे मत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कृषी अभ्यासक ईश्वर भूता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.

नवीन कृषी कायद्याबाबत आपली भुमिका काय?खरे सांगायचे झाल्यास शेतक-यांच्या प्रश्नावर आजवर गंभीरपणे पाहिले गेलेले नाही. शेतकरी संघटनेचे नेते स्व.शरद जोशी यांनी यापूर्वी अनेक मुद्दे मांडले होते. त्या त्या काळातील सरकारांनी त्याची दखल घेवून व शेतक-यांच्या प्रश्नांवर अभ्यास करून कृषी विधेयके आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यात स्व.नरसिंहराव पंतप्रधान असतांना प्रयत्न झाला. पण तो सफल झाला नाही. मनमोहनसिंग यांनीही ही बाब विचारात घेतली. पण तेंव्हाही शक्य झाले नाही. आता विद्यमान सरकारने कृषी कायदा केला आहे. हा कायदा सर्वच बाबीने शेतक-यांच्या हिताचा आहे असे नाही. अनेक त्रुटी त्यातही आहे. खासकरून बाजार समिती्वरील नियंत्रण, एमएसपी कायदा, शेतकरी आणि व्यापा-यात वाद झाल्यास तो महसूल विभागाकडे सोडवावा अशा अनेक बाबी शेतकर-यांना न्याय देणा-या नाहीत. 

आजच योग्य वेळ ... आज नवीन कृषी कायद्यासंदर्भात देशभरात आंदोलन सुरू आहे. आंदोलकांच्या काही भुमिका सरकारनेही मान्य केल्या आहेत. त्यामुळे शेतकरऱ्यांच्या सर्वांगीण हिताचा नवीन सुधारीत कायदा तयार करण्याची सद्याची योग्य वेळ आहे. सरकार आणि आंदोलनकर्ते यांनी बसून कायद्यात शेतक-यांच्या हिताचा सुधारणा करून घेणे गरजेचे आहे. सरकार आणि आंदोलकांनी  त्याबाबत एकमेकांचा विरोध करून केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा समन्वयातून सर्व व्यापी कायदा करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेती मालाला भाव मिळावा शेतक-यांवरच बंधने लादून कायद्याच्या चौकटीत बांधण्यापेक्षा त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा हीच शेतक-याची मागणी आहे.