शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी दिलेला पपईचा दर व्यापाऱ्यांच्या पचनी पडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदी असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला वाढीव दर देण्यास असमर्थता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदी असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला वाढीव दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे़ उत्पादक संघर्ष समिती, व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांच्यात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी तीन रुपये दर कमी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शेतकºयांनी तो फेटाळून लावल्याने येत्या काळात शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे़शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभागृहात पपईच्या दराबाबत तिढा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, विशाल पाटील, भरत पाटील, शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थान वाले, राहुलभाई राजस्थान वाले, हाजी अहमद हाजी नाजीम हे शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते़पाच दिवसांपूर्वी शेतकºयांनी केलेल्या मागणीनुसार व्यापाºयांनी पपईचे दर वाढवले होते़ १५ रुपये ५५ पैसे प्रतिकिलो या प्रमाणे हा दर देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ परंतू पाच दिवस पूर्ण होत नाहीत तोवरच व्यापाºयांनी बाजारपेठेतील मंदीचे कारण देत दर परवडत नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे़ या प्रकारामुळे शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दर कमी करण्यास नकार दिला आहे़ दरम्यान बाजार समितीत झालेल्या बैठकीत देण्यात येणाºया १४ रुपयांच्या दरात कपात करण्याबाबत व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा करण्यात आली़

बैठकीत व्यापाऱ्यांनी पपईचे दर तीन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता़ परंतू त्यावर एकमत झाले नसल्याने बोलणी फिस्कटली होती़ ही बोलणी पुन्हा व्हावी अशी अपेक्षा व्यापाºयांची होती़ त्यानुसार गुरुवारी रात्री बैठक घेण्यात आली़ व्यापारी शेतकºयांना १३ रुपये दर देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे़ एकीकडे दरांवरुन व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा सुरु असली तरी मागील दराने पपई खरेदी करण्यात येत असल्याचे चित्र आहे़ व्यवहार सुरुच असल्याने शेतकºयांना दिलासा मिळत आहे़ गुरुवारच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़दरम्यान दर कमी करण्याची गळ घालणाºया व्यापाºयांना दक्षिण भारतातील पपई अडसर ठरत असल्याची माहिती समोर आली आहे़ उत्तर भारतात शहादा येथून निर्यात करण्यात येणाºया पपईला मोठी मागणी आहे़ परंतू यंदा या पपईला दक्षिण भारतातून निर्यात करण्यात येणाºया पपईसोबत स्पर्धा करावी लागत आहे़ यातून पपईची आवक वाढल्याने दर कमी झाल्याने येथील व्यापाºयांना नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातून व्यापारी दर कमी करण्यासाठी आग्रही आहेत़

उत्तर भारतातील राज्यात नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या पपईला मागणी असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांसोबत संघर्ष करणे टाळत आहेत़ यातून मार्चमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उत्पादन खराब होण्याची भिती असल्याने दरांबाबत ओढाताण करणे योग्य ठरणार नसल्याने व्यापाºयांकडून सांगण्यात आले आहे़ परिणामी गुरुवारी होणाºया बैठकीतून योग्य तो मार्ग निघून शहादा तालुक्यातील पपई उत्तर भारतात रवाना होणे सुरुच राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़