शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

नंदुरबारात गौण खनिजाची सर्रास लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 11:54 AM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  महसूल विभागाला आव्हान देत लाखो रुपयांचे गौणखनिज दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांना प्रशासना पाठीशी घालत असल्याचे चित्र ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  महसूल विभागाला आव्हान देत लाखो रुपयांचे गौणखनिज दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांना प्रशासना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. शहरातील वाघेश्वरी टेकडीवरील हजारो ब्रास गौण खनीजाची लूट करणाऱ्यांपर्यंत प्रशासन पोहचू शकले नसल्यामुळे संशय व्यक्त होत आहे. या जागेचा पंचनामा होऊन शासनाच्या राॉयल्टी रुपी लाखो रुपयांची कुणी लुटमार केली याची चौकशी होणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात गौण खनिज अर्थात वाळू, मुरूम, दगड यांची लूटमार करणारी संघटनीत गुन्हेगारी सक्रीय आहे. तापीतील वाळूला हजारो रुपयांचा भाव मिळत असल्याने जिल्ह्यातून दिवसाला शेकडो ट्रका वाळू परजिल्ह्यात जाते. वाळू प्रमाणेच मुरूम व खडी तयार करण्यासाठी दगड या गौण खनिजांची देखील मोठ्या प्रमाणावर लुटमार सुरू आहे. शहराच्या अडोशाच्या भागातून अशी लुटमार तर सुरूच आहे. परंतु शहरातीलच आणि भर वस्तींच्या टेकड्यांमधूनही ही लुटमार दिवसाढवळ्या सुरू आहे.  ज्ञानदीप सोसायटी लगत तर खाजगी जागा असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज काढले जात आहे. परंतु रॅायल्टीच्या स्वरूपात शासनाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडविले जात आहे त्याचे काय? हा प्रश्न निर्माण होतो. पर्यावरणाचा समतोलशहरात थेट खामगाव शिवारापासून ते चौपाळे शिवारापर्यंत टेकडीची एक रांग गेली आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालाणाऱ्या, पर्यावरणाचे संवर्धन करून शहरवासीयांना धूळीपासून, जमिनीच्या धूपपासून आणि जमिनीतील पाणी पातळी टिकविण्यापर्यंत मदत करणाऱ्या टेकड्यांची ही रांग पोखरण्याचे काम गौण खनिजमाफीया करीत असल्याचे चित्र आहे. हजारो ब्रासची लूटवाघेश्वरी टेकडी तर पुर्णपणे पोखरून टाकली आहे. टेकडीच्या दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणावर मुरूम व दगड काढण्यात आला आहे. दररोज दोन ते चार जेसीबी, पाच ते सात डंपर, तेवढीच ट्रॅक्टर भरून येथून गौण खनिज दिवसाढवळ्या लुटले गेले आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले.  परंतु ‘लोकमत’ने समाजहित लक्षात घेत या प्रश्नाला आणि या लुटमारीला वाचा फोडली. त्यानंतर संबधीतांनी तेथून गाशा गुंडाळला. पंचनामे का नाही?असे असले तरी आतापर्यंत येथून काढण्यात आलेले गौणखनिज, पोखरलेल्या टेकड्या यांचा पंचनामा का होत नाही. किती ब्रास गौण खनिज काढले गेले, ते कुणी व कुठे नेले याची चौकशी करण्यास महसूल विभाग का धजावत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. या ठिकाणचा पंचनामा करून संबधितांकडून रॅायल्टी वसूल करणे अपेक्षीत आहे. तसे न झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्याीच मागणी होत आहे. 

   पाच पट वसुलीचा नियम शासनाची परवाणगी न घेता गौण खनिजाचे उत्खनन केल्यास एकुण बाजार मुल्याच्या पाच पट रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते. शिवाय या कामासाठी जे साहित्य वापरण्यात येते जसे जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर व इतर साहित्य जप्त करण्याचा अधिकार देखील संबधित अधिकाऱ्यांना असतो. 

   खाजगी जमीन असली तरी... गौण खनिज ज्या जागेवर काढण्यात येते ती जागा जरी खाजगी मालकीची असली तरी त्यांना कुठल्या प्रयोजनासाठी गौण खनिज काढावयाचे आहे. त्याची राॉयल्टी भरणे आदी प्रक्रिया पार पाडाव्याच लागतात. असे असतांना नंदुरबारात त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. 

कारवाईचा दावा... : याबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अवैध गौण खनिजाबाबत कारवाईचे सत्र सुरू असल्याचे सांगितले. बुधवारी देखील दोन ट्रॅक्टर जप्त केल्याचे सांगून वाघेश्वरी टेकडीवरील उत्खनाबाबत माहिती घेत असल्याचे ते म्हणाले.