शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांचा समाना करीत असतांनाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांचा समाना करीत असतांनाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये मोठी भर पडली आहे.कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात सुरु विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांचाच एक भाग असलेल्या संचारबंदीत सर्वच घटक अडले आहे, त्यातून शेतकरीही सुटला नाही. वाहतुक बंद झाल्याने शेतमाल पडून आहे. बहुतांश पिके शेतातच खराब होत आहे. अशा समस्यांशी शेतकरी या दोन हात करीत असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दुपटीने भर पडली आहे.नंदुरबार तालुक्यातील शहादा शहादे व कोपर्ली भागात गहू पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकºयांचे गव्हाचे पिक काढणीचा कालावधी आला आहे.त. परंतु सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे गहू कापणीसाठी कुठलाही हार्वेस्टर मालक पुढे धजावत नाही. परिणामी पिके शेतातच आहे. असे असतांनाच अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.पपई उत्पादकांची देखील हीच परिस्थिती आहे. संचारबंदीमुळे पपई खरेदीसाठी व्यापरी येत नाही. पपईची तोडणीच झाली नसल्यामुळे बहुतांश शेतकºयाची पपई परिपक्वहोऊन झाडावरच पिकली, काही पपई खराब देखील झल्या. अशी समस्या असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस झाला, या पावसाने अन्य पपईच्या बागाही व्यापल्या असून फळे खराब होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काही नियम शिथील करण्याची मागणी होत आहे.