लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात 38 वर्षीय महिलेवर एकाने धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी केल़े सोमवारी ही घटना घडली़ कुरेशी मोहल्ला परिसरात राहणा:या निलोफर जहाँमोहंमद अली कुरेशी यांच्यासोबत नईम शेख जुल्फेखार कुरेशी याने वाद घातला होता़ दरम्यान नईम शेख याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने निलोफर यांच्यावर वार केला़ यातून त्यांच्या हाताला दुखापत झाली़ याबाबत निलोफर कुरेशी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित नईम शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}