मद्य खरेदीसाठी जिल्ह्यात सकाळी सहापासून रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:16 IST2020-05-06T12:16:10+5:302020-05-06T12:16:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने मंगळवारी सुरु होणार असल्याची माहिती मिळाल्याने सकाळी सहा वाजेपासून मद्य ...

Queues in the district from 6 a.m. for liquor purchases | मद्य खरेदीसाठी जिल्ह्यात सकाळी सहापासून रांगा

मद्य खरेदीसाठी जिल्ह्यात सकाळी सहापासून रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने मंगळवारी सुरु होणार असल्याची माहिती मिळाल्याने सकाळी सहा वाजेपासून मद्य खरेदी करण्यासाठी दुकानांबाहेर रांगा लावण्यात आल्या होत्या़
नंदुरबार शहरात स्टेशन रोड व गिरीविहार परिसरात मद्य विक्रीच्या दुकानासमोर गर्दी झाली होती़ ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातून नागरिक खरेदीसाठी रांगा लावून उभे होते़ विशेष बाब म्हणजे यावेळी सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात आले़
दरम्यान लगतच्या गुजरात राज्यातूनही शौकीनही मद्य खरेदीसाठी आले होते़ १२ वाजेपर्यंत मिळेल तेवढा साठा करण्यावर उत्साहींकडून भर देण्यात येत होता़ यावेळी डबलसीट जाणाऱ्यांना पोलीसांनी कारवाईचा दंडुका दाखवत मद्य खरेदीच्या उत्साहातून बाहेर आणले़
एकीकडे मद्य खरेदीचा उत्साह असताना दुसरीकडे बाजारपेठेतही तोबा गर्दी झाली होती़ गर्दीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याचे समजल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी तातडीने पालिका मुख्याधिकारी यांना माहिती देत पथकांना सांगून दुकाने बंद करण्याचे सांगितले़ केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्यात आल्याने खरेदीसाठी आलेल्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले़

Web Title: Queues in the district from 6 a.m. for liquor purchases