शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू असून, बुधवारी २०० गाड्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू असून, बुधवारी २०० गाड्या कापूस आल्या होता. त्यापैकी सुमारे साडेचार हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. या आठवड्यात १४ मार्चपर्यंत कापूस खरेदी केली जाईल, अशी माहिती समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली.शासनाच्या कॉटन कापोर्रेशन आॅफ इंडिया सीसीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांकडून योग्य तो भाव न मिळाल्याने शेतकºयांनी कापूस विक्री ना करता सांभाळून ठेवला होता. गत महिन्यापासून सीसीआयमार्फत जिल्ह्यात नंदुरबार व शहादा या दोन ठिकाणी कापसाची खरेदी केली जात होती. मात्र खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध होत नसल्याने बºयाच वेळा ही खरेदी थांबविली जात होती.शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारपासून १४ मार्चपर्यंत सीसीआयमार्फत कापसाची खरेदी केली जात आहे. पहिल्या दिवशी सुमारे २०० गाड्या कापूस विक्रीसाठी समितीच्या आवारात दाखल झाल्या होता. त्यापैकी सायंकाळी उशिरापर्यंत १०० गाड्यांचे मोजमाप झाले असून, यातून सुमारे साडेचार हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.या आठवड्यात १४ मार्चपर्यंत खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकºयांनी आपला कापूस बाजार समितीत आणावा असे आव्हान चेअरमन सुनील पाटील व संचालक मंडळाने केले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शहादा हे सीसीआयचे एकमेव खरेदी केंद्र सुरू आहे. बुधवारपर्यंत येथे सुमारे एक लाख लाख ६३ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.