शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

कायदा मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा यानुसार जिल्हाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा यानुसार जिल्हाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क वापरणे बंधनकारक केले आहे़ तसेच रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी थुंकणाऱ्यांना दंड करण्याचे आहेत़ या आदेशानुसार पालिका पथकाने बाजारपेठेत भेट दिली असता पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ दरम्यान नंदुरबार न्यायालयानेही तिघांना दंडाची शिक्षा सुनावली आहे़नंदुरबार पालिका मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात शहरातील सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे ,रस्त्यावर थुंकणाºयांवर कारवाई करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे़ या पथकाने शहरातील तीन मटन विक्रेते, एक मेडीकल व एका किराणा दुकानावर दंडात्मक कारवाई केली़ त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ पथकाने शहरातील विविध भागात गॅरेज, आईस्क्रीम विक्रेते, फळं, भाजीपाला विक्रेते यांनाही समज देण्यात येऊन कारवाईचा इशारा देण्यात आला़ पथकात राजेंद्र पाखले, निखील तांबोळी, सायली बाविस्कर, मानसी मराठे यांचा समावेश आहे़ शहरातील अनेक रस्त्यांवर फळ आणि भाजीपाला विक्री करणाºयांना पथकाने सोशल डिस्टन्सिंगची माहिती दिली़ आॅरेंज झोन असल्याने सोमवारपासून दुकाने सुरु होण्याची शक्यता आहे़या पार्श्वभूमीवर पथकांकडून बाजारात विक्रेत्यांना सोशल डिस्टिन्सिंगचे महत्त्व समजावून देण्यात आल्याने सोमवारी सुरु होणाºया बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन होणार नसल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़१४ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील सिंधी कॉलनी ते मिशन हायस्कूल या दरम्यान मनोज अशोक गायकवाड, सुधीर डेव्हिड साने व राकेश शलमोन पंजाबी, भिवसन अशोक नाईक हे मास्क न लावता विनाकारण फिरत असताना पोलीसांना आढळून आले होते़ त्यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ शनिवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़ए़विराणी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते़ चौघेही दोषी आढळून आल्यानंतर न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपये दंड सुनावला़१४ एप्रिल रोजीच सायंकाळी गौतम सुन्नाबारामजी मिस्बा, अविनाश नारायण भामरे व सुखलाल शंकर मराठे हे विनाकारण फिरताना आढळून आले होते़ त्यांच्यावर कारवाई करत शनिवारी त्यांना पोलीसांनी न्यायमूर्ती विराणी यांच्यासमोर हजर केले होते़ तिघांना दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला़कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे़ दरम्यान १६ एप्रिल रोजी शहरातील पटेलवाडी भागा कमरअली सरदार अली मन्यार व इरफान सलीम रंगरेज हे दोघेही गुटखा, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती समोर आली होती़ यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दिवटे यांनी दोघांना रंगेहाथ पकडले होते़ ्त्यांच्यासमोर दुकानाची झडती घेतली असता तेथून ८ हजार ८०३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता़ या दोघांना शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़ए़विराणी यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला़ पोलीसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी कौतूक केले़ दरम्यान शिक्षा सुनावताना न्यायालयाने नागरिकांनी बेजबाबदार वर्तन टाळावे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण करण्यात येणाºया आदेशांचे पालन करण्यात यावे असे सांगितले़ लॉकडाऊन काळात बेकायदेशीर गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाºयांची माहिती नागरिकांनी पोलीसांना द्यावी असेही न्यायालयाने सांगितले़