शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कायद्याच्या अध्यादेशाला स्थगितीच्या निषेधार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र सरकारने आणलेला शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपतर्फे नंदुरबारसह तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करून राज्य शासनाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र सरकारने आणलेला शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपतर्फे नंदुरबारसह तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारात भ्आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारच्या कृषी अध्यादेशाचे राज्यात अंमलबजावणी करणारे परीपत्रकाला राज्य सरकारने स्थगीती दिली. राष्ट्रवादीचे नेते शशीकांत शींदे यांच्या अपीलावर सहकार वर पनन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारच्या आदेशाला एकापरीपत्रकान्वये स्थगीती दीली. या निर्णयाचा विरोधात भाजपाचे राज्यभर आंदोलन पुकारले आहे. आज बुधवारी नंदुरबार येथे कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारात भाजपा तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक देश एक बाजारपेठ या संकल्पनेमुळे देशातील शेतकरी आर्थीक दृष्टया सक्षम होणार असुन शेतकरी आपला माल आता देशात कुठेही विकु शकतो. त्यामुळे त्याचा कष्टाच्या शेतीमालाला मुबलक दाम मिळणार असल्याने भयभीत झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या बिलास राज्यात केंद्राच्या कायदयाचा अंमलबजावणीस स्थगीती दिली आहे. ही बाब शेतकरी विरोधी असुन महाआघडी सरकारच्या शेतकरी विरोधी आदेशाचा आम्ही होळी करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगीतले.याप्रसंगी प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, संगठन जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, भाजपचे किसान मोचार्चे जिल्हाध्यक्ष बुधाभाई पटेल, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष सुदाम पटेल, संजय साठे, सतीश पाटील, संजय पाटील, नरेंद्र पाटील, पंकज पाटील, अरुण पाटील, प्रशांत पाटील, विजय नाईक उपस्थित होते.अक्कलकुवा तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करताना भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, तालुका मंडळअध्यक्ष विनोद कामे, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. सुधिर पाडवी, पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी, युवा मोर्चा जिल्हा संघटक सरचिटणीस कुणाल जैन,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बापू महिरे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा चिटणीस गुलाबभाऊ अहिरे, युवा मोर्चा चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवी शुक्ला उपस्थित होते.