शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांना लवकरच पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 12:03 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यक पदी व आरोग्य सेविका यांना आरोग्य साहाय्यिका यापदी  सर्व ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यक पदी व आरोग्य सेविका यांना आरोग्य साहाय्यिका यापदी  सर्व रिक्त  जागांवर पदोन्नती देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पत्र पाठवून  आवश्यक त्या कागद पत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी सांगितले.आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाच्या वेळी डॅा. बोडके यांनी ही माहिती दिली. ४ रोजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली व महासंघाचे नेते  डॉ. कांतिलाल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आस्थापनेवरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे  यांना निवेदन देऊन झालेल्या चर्चेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चारही मागण्या  मंजूर करण्यात आल्या होत्या.  व त्यांची पूर्तता दिवाळीनंतर करू  असे सांगितले       होते. या पार्श्वभूमीवर महासंघाने चर्चा केली.  चर्चेत महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे, चिटणीस सतीश जाधव, नितीन पवार, विशाल मोघे, नितीन वाडीले आदी उपस्थित होते. ज्यांच्या सेवाकाळ १०,२० व ३० वर्ष पूर्ण झालेला आहे. अश्याना कालबद्ध पदोन्नतीचे फायदे देण्यासाठी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयाकडून पत्र पाठविण्यात येणार आहे.  सदरची कार्यवाही १० डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून दिलेल्या     शब्दाप्रमाणे अनुषंगिक कार्यवाही अंगीकारण्यात येऊन कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष लाभ पदरात पडेल असा विश्वास आरोग्य कर्मचारी महासंघाचे नेते डॉ कांतीलाल टाटीया यांनी व्यक्त    केला.