शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महाविद्यालयांसह खाजगी क्लासेसही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना अर्थात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना अर्थात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी काढले आहेत. दरम्यान, ग्रामिण भागातील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये नियमित सुरू राहणार आहेत.कोरोनाची भितीमुळे शाळा, महाविद्यालयांधील उपस्थितीवर परिणाम झाला आहे. या आजाराची साथ अधीक पसरू नये यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा निर्गमीत करण्यात आला आहे. या कायद्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, खाजगी व सरकारी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तसेच खाजगी स्वरूपात घेण्यात येणारे सर्व क्लासेस हे ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.या काळात दहावी व बारावीच्या पूर्व निर्धारित परीक्षा सुरू राहणार आहेत. शाळा, महाविद्यालयांमधील कार्यालयीन कामकाज देखील नियमित सुरू राहणार आहे. खाजगी क्लास चालकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी रविवार, १५ रोेजी दुपारी काढले.यामुळे शाळांनी लागलीच आपापल्या सोशल मिडिया गृपवर ही बाब विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.सिनेमागृहे देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वच शासकीय, निमशासकीय सार्वजनिक कार्यक्रम या काळात रद्द करण्यात आले आहेत.दरम्यान, नागरिकांनी या साथरोगासंदर्भात घाबरून जाण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांनी योग्य त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. दक्षता घेतली जात आहे.४३१ मार्च पर्यंत शाळांना सुट्टीचा निर्णय हा आश्रमशाळांबाबत लागू केला नाही. शहरी व ग्रामिण भागात आश्रमशाळा आहेत. तेथे शेकडो विद्यार्थी एकत्र राहतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांबाबत दक्षता पाळण्याच्या ुसुचना यापूर्वीच आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे आपल्या आश्रमशाळा व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत.४शहरी भागातील होस्टेल मात्र ओस पडण्याची शक्यता आहे. कारण शहरी भागातील शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे वसतिगृहे देखील खाली होणार आहेत. त्यामुळे आश्रम शाळांबाबतच्या निर्णयाकडे आता शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे.