शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

अपंगांचे बनावट प्रमाणपत्र देणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:11 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे अपंगांचे बनावट प्रमाणपत्र आणि त्याआधारे एसटी बसमध्ये प्रवासासाठीची सवलतीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे अपंगांचे बनावट प्रमाणपत्र आणि त्याआधारे एसटी बसमध्ये प्रवासासाठीची सवलतीचे कार्ड बनवून देणारा एकजण रंगेहात पकडला गेला. ताब्यात घेण्यात आलेल्याकडून बनावट प्रमाणपत्रे, बनावट शिक्के यासह इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने नंदुरबारात केली. विकी दामोदर शर्मा, रा.खांडबारा असे संशयीताचे नाव आहे.राम गोरख धनगर हे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मित्र राकेश माळी याने त्यांच्याकडील महाराष्ट्र शासनाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र व्हॉटअपरद्वारे टाकुन ते खरे आहे किंवा खोटे याची खात्री करण्याचे सांगितले. राम धनगर यांनी ते प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयातील अपर जिल्हा शल्यचिकितसक यांना दाखविले. त्यांनी ते बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर रामु धनगर यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या इसमास फोन करुन त्याला देखील अपंगत्वाचे प्रमाणपत्र व एस.टी. सवलतीचे ओळखपत्र पाहिजे असल्याचे सांगितले. त्याने दीड हजार रुपयांची मागणी केली.धनगर यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना बोलवुन तक्रारीची खात्री करणे व पथक तयार करण्याच्या सुचना दिल्या. धनगर यांनी संशयीताकडे प्रमाणपत्राची मागणी केली. संशयीताने शहरातील अंधारे चौक येथे भेटण्याचे सांगितले. संशयीत इसमाने रामु धनगर यांचेकडे आधार कार्डची छायांकीत प्रत, दोन फोटो व दीड हजार रुपयांची मागणी केली. १७ रोजी प्रमाणपत्र देण्याचे सांगितले.ठरल्याप्रमाणे १७ रोजी संशयीत इसमाने धनगर यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र घेवुन जाण्यास सांगितले. पथकातील दोन कर्मचारी अंधारे चौकात नारळाची लॉरी घेवुन, दोन कर्मचारी चहाचे स्टॉल लावुन, दोन कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थीच्या वेशात वेशांतर करुन सापळा रचुन होते व एक कर्मचारी रामु धनगर यांचे सोबत होते. धनगर यांना प्रमाणपत्र दिले व पैश्यांची मागणी करीत असतांना पथकातील कर्मचाऱ्यांना सावध केले.विकी दामोदर शर्मा यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एस.टी.महामंडळाचे तीन बनावट ओळखपत्र व अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ४,५१० रुपये रोख व २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली. हवालदार दिपक गोरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक किशोर नवले, हवालदार दिपक गोरे, कर्मचारी राकेश मोरे, मोहन ढमढेरे, किरण मोरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.

अटक करण्यात आलेल्या शर्मा याने कुणाकुणाला अशा प्रकारचे प्रमाणपत्र दिले आहेत. संबधितांना त्याचा वापर कधीपासून आणि कुठेकुठे केला आहे याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तींही आता रडावर येणार असून त्यांच्या शोध घेण्याचे काम आता एलसीबीच्या पथकाकडून तसेच तपासी अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे शर्मा याच्याकडून प्रमाणपत्र घेतलेल्या इतरांचेही धाबे दणाणले आहे. अशा लोकांची आता धावपळ सुरू झाली आहे.