शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय आश्रमशाळांना जि.प. अध्यक्षांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांनी तालुक्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांनी तालुक्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय आश्रमशाळांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी रूग्णांना चांगली सेवा आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनास दिल्या. दरम्यान, त्यांनी रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे संबंधितांना सांगितले.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अ‍ॅड.वळवी यांनी आपला कार्यभार हाती घेतल्यानंतर प्रथमच तळोदा तालुक्यातील बोरद, मोरवड येथील आरोग्य केंद्र व उपकेंद्रास भेट दिली. त्यांच्या समवेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सुधाकर पाटील उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी मोरवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. तेथे औषधांचा साठा, नोंदवही, कर्मचाऱ्यांच्या गाव भेटी आदी बाबींची तपासणी केली. त्यात समाधान आढळून आले. त्यानंतर प्राथमिक शाळेस भेट दिली. विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन घेतले होते. परंतु विद्यार्थ्यांना धड वाचन करता येत नसल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यात सुधारणा करण्याची सक्त ताकीद शिक्षकांना दिली. त्यानंतर त्यांनी बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. तेथे आॅपरेशन कॅम्पसाठी सर्वच कर्मचारी गुंतलेले होते. या भेटीत त्यांनी औषधांचा साठा तपासून पाहिला. त्याचबरोबर रूग्णांशीदेखील संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. याप्रसंगी रूग्णांनी चांगली सेवा मिळत असल्याचे सांगितले. तरीही चांगली सेवा व रुग्णांना आपुलकी देण्याची सूचना कर्मचाऱ्यांना देवून मोठ्या प्रमाणात रूग्ण शासकीय रूग्णालयात उपचारासाठी वळले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी रूग्णालयाच्या बांधकामाचीही पाहणी करून बांधकाम दर्जात्मक राखण्याची सूचना केली.बोरद जवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळांनादेखील त्यांनी भेट दिली. त्या वेळी विद्यार्थी जेवन करीत होते. नवीनच सुरूवात केलेल्या सेंट्रल किचन पद्धतीची तपासणी केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत भौतिक सुविधांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा तत्काळ मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी दिली. आश्रमशाळांना पुरविण्यात आलेल्या रूग्णवाहिकेच्या नियमिततेबाबत माहिती जाणून घेतली. या वेळी आश्रमशाळेतील सर्वच कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.