तालुका विज्ञान प्रदर्शनात ९२ उपकरणांचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:36 IST2019-12-21T12:36:13+5:302019-12-21T12:36:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाच्यावतीने तालुका ...

Presentation of 19 devices at the Taluka Science Exhibition | तालुका विज्ञान प्रदर्शनात ९२ उपकरणांचे सादरीकरण

तालुका विज्ञान प्रदर्शनात ९२ उपकरणांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाच्यावतीने तालुका विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते़ यात ९२ उपकरणे सादर करण्यात आले.
बोरदच्या मॉडर्न इंग्लिश स्कुलमध्ये झालेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले होते़ दोन दिवस सुरु असलेल्या या उपक्रमात तालुक्यातील ३२ शाळांमधील विद्यार्थ्यांकडून ९२ उपकरणे मांडण्यात आली. गुरुवारी विज्ञान प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला़ यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, बी.आर. रोकडे, एन.डी.पाटील, एम.एम.धनगर, डी.टी.देवरे, निमेश सुर्यवंशी, मुकेश पाटील उपस्थित होते. तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच वैज्ञानिक दृष्टीकोन वाढील लागेल, असे मान्यवरांनी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Presentation of 19 devices at the Taluka Science Exhibition