शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा येथील कालिका माता यात्रेची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : माघ शुद्ध पौर्णिमेपासून भरणाऱ्या सोरापाडा (अक्कलकुवा) येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : माघ शुद्ध पौर्णिमेपासून भरणाऱ्या सोरापाडा (अक्कलकुवा) येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवाला जुनी परंपरा लाभली असून हा यात्रोत्सव शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. १९ फेब्रुवारी १९२० रोजी महाकाली मातेची पहिली यात्रा भरविण्यात आली होती.९ फेब्रुवारीला संध्याकाळी अक्कलकुवा परिसरातील गंगापूर, ठाणाविहीर, खटवानी, जामली, मिठ्याफळी येथील नागरिक सवाद्य तगदरावांची मिरवणूक काढून विधीवत पूजा करतात. त्यानंतर यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेच्या प्रारंभी श्री महाकालिका देवीच्या प्रथम आरतीचा मान काठी चिप्टनच्या वारसदारांना दिला जातो. अक्कलकुवा तालुक्यातील काठी चिप्टन इस्टेटचे राजे रणजितसिंग सूरजसिंग पाडवी यांना पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे त्यांनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या नावाने पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता. देवीच्या नावाने केलेला नवस खरा ठरला व आशीर्वाद स्वरुपात पुत्र प्राप्त झाला. नवसपूर्ती म्हणून १९२० मध्ये राजेंनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या मंदिराचे साध्या पद्धतीने बांधकाम करुन देवीची व महादेवाची पिंड स्थापन करण्यात आली होती. त्याकाळी काठी चिप्टन यांनी देवीची पूजाअर्चा व मंदिराच्या विकासासाठी १२ एकर २७ गुंठे जागा दान केली. १९८२ मध्ये आलेल्या चक्रीवादळात मंदिराशेजारी असलेले भव्य वडाचे झाड कोसळल्याने मंदिराचा गाभा वगळता मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंदिराच्या विकासाठी १९८६ मध्ये सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मंदिराची विश्वस्त म्हणून नोंद करुन घेण्यात आली. प्रथम विश्वस्त म्हणून लखाभाऊ मराठे व मधुकर लोहार यांच्या कमिटीने काम पाहिले. मंदिराच्या विश्वस्तांनी नव्याने मंदिर उभारुन २००६ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरासमोर हनुमान व महादेव मंदिर उभारण्यात आले आहे.गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात ही यात्रा भरत असल्याने सातपुड्यातून हजारो गावठी व खिल्लारी जातीचे बैल विक्रीला येतात. बैल बाजारावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण असते. बैलांच्या खरेदी-विक्रीतून अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. बैलगाड्यांसह शेतीपयोगी साहित्याचीही विक्री मोठी होते. मनोरंजनासाठी लहान-मोठ्या पालख्या, मौत का कुवा, संसारोपयोगी साहित्य, भांडी, खेळणीची दुकाने, हॉटेल्स, रसवंतीगृहे यासह सुमारे ५०० व्यावसायिक यात्रेत दुकाने थाटतात. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून भाविक नवस पूर्ण करण्यासाठी येथे येतात. ही यात्रा सात दिवस भरते. यात्रेसाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र पाडवी, उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी यांच्यासह सदस्य परिश्रम घेत आहेत.