काँग्रेसच्या मेळाव्यात ५६ जागांसाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:44 IST2019-12-11T11:44:52+5:302019-12-11T11:44:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूकीत काँग्रेस पक्ष संपूर्ण ५६ गट आणि ११२ गणांमधून उमेदवारी देणार असल्याचे ...

Preparations for 6 seats in the Congress rally | काँग्रेसच्या मेळाव्यात ५६ जागांसाठी तयारी

काँग्रेसच्या मेळाव्यात ५६ जागांसाठी तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूकीत काँग्रेस पक्ष संपूर्ण ५६ गट आणि ११२ गणांमधून उमेदवारी देणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले़ शहरातील संजय टाऊन हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या या मेळाव्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़
मेळाव्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार के़सी़पाडवी, नवापुरचे आमदार शिरीष नाईक, पक्ष निरीक्षक विनायक देशमुख, माजी मंत्री अ‍ॅड़ पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी सभापती सीक़े़पाडवी, रतन पाडवी यांच्यासह तालुकास्तराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़
यावेळी आमदार के़सी़पाडवी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संपूर्ण जागा लढवण्याबाबत चर्चा करुन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे सांगितले़ दरम्यान त्यांनी वरिष्ठ पातळीवर आघाडी झाली असली तरी स्थानिक पातळीवर निवडणूका लढवण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच गट गणांसाठी उमेदवारी करुन विजय प्राप्त करण्याचे सांगितले़
आमदार नाईक, माजी मंत्री वळवी तसेच माजी आमदार पाडवी यांनीही कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला़ मेळाव्यानंतर गट आणि गणनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या़ यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते़

Web Title: Preparations for 6 seats in the Congress rally