शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

मैदानांवर पुन्हा गजबज नंदुरबार : शहरातील विविध भागातील मैदाने सकाळी आणि सायंकाळी गजबजत आहेत. नागरिक फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी मैदानाचा ...

मैदानांवर पुन्हा गजबज

नंदुरबार : शहरातील विविध भागातील मैदाने सकाळी आणि सायंकाळी गजबजत आहेत. नागरिक फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी मैदानाचा आधार घेत आहेत. यात अनेक जण संपूर्ण कुटुंबासह व्यायाम करत असल्याचेही दिसून येत आहे. पहाटे सहा व सायंकाळी सहा पासून मैदाने गजबजत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा बँकेच्या शाखा जवळ एटीएम

नंदुरबार : जिल्हा बँकेने पीक कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत ६० कोटींपेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले आहे. हे क तात्पुरत्या स्वरुपातील रुपे कार्डच्या माध्यमातून हे कर्ज वाटप करण्यात येत आहे. दरम्यान कर्ज प्राप्त झाल्यानंतर एटीएम गरजेचे असल्याने जिल्हा बँकेने फिरते एटीएम सुविधा सुरु केली आहे. हे एटीएम त्या-त्या शाखांच्या खाली थांबत असल्याने सोय होत आहे.

ग्रामीण भागात हजेरी

नंदुरबार : अनलाॅकनंतर ग्रामीण भागात विविध वस्तू विक्री करणारे हजेरी लावत आहेत. दुकाने सुरु झाल्याने होलसेलरकडून माल मिळत असल्याने मोठ्या संख्येने फेरीवाले ग्रामीण भागात जात आहेत. यात प्रामुख्याने कपडे, भांडी, खेळणे यासह विविध दुकानदारांचा समावेश आहे.

पथकांकडून भेटी

नंदुरबार : तालुक्यातील गावांमध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली होती. याअंतर्गत ज्या ठिकाणी आरोग्य समस्या असलेले नागरिक आहेत. अशा नागरिकांच्या भेटी घेत पथकांकडून तपासणी केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोथिंबीरची आवक वाढली

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागातून बुधवारी बाजारपेठेत काेथंबीरीची मोठी आवक झाली होती. १० रूपयात तीन जुड्या विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली होती. सोबतच पालक, मेथी व पोकळा यांचीही आवक झाल्याचे दिसून आले. बाजारात मंगळवारी भाजीपाला विक्रेत्यांपेक्षा शेतकरीच अधिक दिसून येत होते. स्वस्त अशा त्यांच्या भाजीपाल्याची खरेदी नागरिकांकडून केली गेली. बाजारात या भाज्यांना मोठी मागणी होती.

आमचूरला हंगाम कमी

धडगाव : आमचूर हंगामाची सांगता झाली असल्याचे दुर्गम भागात दिसून येत आहे. यंदा दर कमी असल्याने आदिवासी बांधवांचे नुकसान झाले आहे. दोन वर्षांपासून आमचूर खरेदी विक्रीत घट आल्याने या भागातील आर्थिक उलाढालीवर परिणाम झाल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगण्यात आले आहे.

बेशिस्ती कायमच

अक्कलकुवा : शहरातील बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर टाळण्याचे प्रकार कायम आहेत. पोलीस प्रशासनाकडून कारवाई होऊनही योग्य ती शिस्त लागत नसल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात दररोज सकाळी सात वाजेपासून गर्दी उसळत आहे.

मंदाणे येथे सुविध द्या

ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी भरती व इतर सुविधा देण्याची मागणी आहे. याठिकाणी रिक्त पदांची संख्या मोठी आहे. याबाबत पाठपुरावा करुन ही कार्यवाही झालेली नाही. यामुळे रुग्णसेवेवर ताण पडत आहे.

सीमावर्ती भागात चिंता

शहादा : शहादा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगतच्या गावांमध्ये सध्या चिंतेची स्थिती आहे. या भागातून प्रवासी वाहतूक सुरु आहे. या वाहनांमधील प्रवाशांची आरोग्य तपासणी करुन मगच त्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.