शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा बॅरेज पुन्हा ‘रामभरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज आजच्या स्थितीला पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र येथे सुविधांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज आजच्या स्थितीला पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र येथे सुविधांचा अभाव आहे. सिक्युरिटी गार्ड नसून लाखो रुपये खर्च करून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. शिवाय त्याचे टीव्ही स्क्रीनदेखील ठेवलेला नाही. म्हणून शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्च निरुपयोगी ठरत आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून माहिती देण्यासाठीही टाळाटाळ केली जाते.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा बॅरेज महत्त्वाचा ठरतो. वैयक्तिक पाणी परवानगी घेतलेल्या शेतकºयांची जमीन सिंचनासाठी उपयोगी ठरत आहे. मात्र आजच्या स्थितीला कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेला बॅरेज रामभरोसे आहे. कारण याठिकाणी दोन वषार्पासून सिक्युरिटी गार्ड नसल्याने बॅरेजवर ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यात सहा कॅमेरा आहेत पैकी दोन जम्बो कॅमेरे आहेत. मात्र एका वर्षातच म्हणजे २५ जानेवारी २०१९ ला लेन्स खराब झाली होती. म्हणून उपविभागीय अधिकारी पाटबंधारे शाखा प्रकाशा यांनी कार्यकारी अभियंता धुळे यांना पत्र लिहून येथील सीसीटीव्ही कॅमेरे खराब झाल्याचे कळवले होते. ते दुरुस्त होत नाही तोच पाच महिन्यात ‘जैसे थे’ परिस्थिती झाली. सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा बंद पडले आहेत. त्याला आॅपरेट करणारा कोणी नाही. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपयांचा केलेला खर्च वाया गेल्यातच जमा आहे.बॅरेजवर सिक्युरिटी गार्ड नाही व सीसीटीव्ही बंद आहेत याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी प्रकाशा येथील बॅरेजच्या कार्यालयात संपर्क साधल्यास माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. उपविभागीय अभियंता भेटत नाहीत. येथे प्रकाशा बॅरेज तापी जलविद्युत व उपसा जलसिंचन योजना विभाग क्रमांक दोनचे कार्यालय आहे. तेथे चौकशी केली असता त्यांनीही आमचा संबंध नाही, अशी उत्तरे देण्यात आली. याबाबत पाटबंधारे विभागाचे धुळे येथील कार्यकारी अभियंता दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत मला माहिती नाही. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बंद का आहेत याची माहिती संबंधित विभागाला विचारतो. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असताना त्याबाबत रिपोर्ट का केला नाही याविषयी चौकशी करतो, असे सांगितले.शेतकºयांसाठी वरदान ठरलेल्या प्रकाशा बॅरेजच्या सुरक्षेविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनीच लक्ष घालून या बॅरेजवरील सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.