शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिकांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST

जयनगर, धांद्रे, उभादगड, निंभोरे, कोंढावळ, कहाटूळ परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पण या रब्बी हंगामातील ...

जयनगर, धांद्रे, उभादगड, निंभोरे, कोंढावळ, कहाटूळ परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पण या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्रानुसार शेतकऱ्यांना आठ दिवस रात्री व आठ दिवस दिवसा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रपाळीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, थंडीमुळे रात्रभर उभे राहून पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. रात्रपाळीची वीज कायम असल्यामुळे शेतकऱ्यांना हिंस्र प्राणी तसेच सरपटणार्‍या प्राण्यांपासूनही जीवितास धोका निर्माण झाला आहे. रात्री आठ दिवस वीज न देता कृषिपंपासाठी कायमस्वरूपी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून होत असतानाही रात्रपाळीचीच शिफ्ट चालू आहे.

रात्रपाळीत रात्री उशिरा वीज येत असल्यामुळे शेतकऱ्यांना सोबत बॅटरी आणि काठी घेऊन शेतात जावे लागते. रात्री-अपरात्री पाणी भरत असताना डीपीवर तांत्रिक बिघाड झाल्यास त्यावेळेस शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. रात्री तांत्रिक बिघाड झाल्यास शेतकरी वायरमनलाही शेतात डीपी दुरुस्तीसाठी बोलवू शकत नाही किंवा स्वतःही डीपीवरील फ्यूज किंवा डिओ उडाला असल्यास अंधाऱ्या रात्रीत दुरुस्ती करू शकत नसल्यामुळे पिकांना पाणी न देता शेतकऱ्यांना रात्रीचा मुक्काम शेतातच करावा लागत आहे. रात्रीच्या शिफ्टमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, शेतीसाठी कायमस्वरूपी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.