शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेला शेतातून वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील धनराट येथील आश्रमशाळेला शेत शिवारातील कृषीपंपावरुन वीज पुरवठा होत असल्याचे समोर आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील धनराट येथील आश्रमशाळेला शेत शिवारातील कृषीपंपावरुन वीज पुरवठा होत असल्याचे समोर आले आह़े यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त होत असून याकडे नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आह़े धनराट येथे आदिवासी विकास विभागातर्फे 1973 पासून आश्रमशाळा सुरु आह़े प्राथमिक आणि माध्यमिक अशा या आश्रमशाळेत गेल्या काही वर्षात सुविधांची वानवा झाली आह़े गेल्या वर्षी आश्रमशाळेत कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता़ या घटनेनंतर येथे विविध सुविधा देण्याची गरज असतानाही कारवाई झालेली नाही़ आश्रमशाळेत तूर्तास साधारण 400 च्या जवळपास विद्याथ्र्याचे प्रवेश झाल्याची माहिती आह़े गावालगत आश्रमशाळेसमोरच वीज कंपनीचे पोल आहेत़ यामुळे तेथून वीज पुरवठा करणे रास्त असताना आश्रमशाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका शेतातून वीजेचा पुरवठा करण्यात आला आह़े कृषीपंपाचा वीज पुरवठा रात्री आठ आणि दिवसा आठ तास असतो़ यामुळे विद्याथ्र्याना अंधाराचा सामना करावा लागतो़ रात्री जेवणाच्या वेळेस अंधार रहात असल्याने विद्यार्थी अडचणीत येतात़ सोबतच याभागात सापांसह इतर किटकांच्या चावा घेण्याचा मोठा धोका आह़े कुत्र्यांचाही वावर पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त होत आह़े  सर्व अडचणी लक्षात घेऊन नंदुरबार  प्रकल्प कार्यालयाने तातडीने वीज पुरवठा नियमित फिडरवरुन करण्याची मागणी होत आह़े याबाबत पालकांनी प्रकल्प कार्यालयासह ठिकठिकाणी निवेदन दिले होत़े परंतू कारवाई झालेली नसल्याने येत्या काळात सामाजिक संघटनांच्या साथीने आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आह़े