शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

गाव, पाड्यांचे विद्युतीकरणाचे काम लांबल्याने वीज कंपनी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील गाव पाड्यांचे विद्युतीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने जिल्हा दक्षता व सनिंयत्रण समितीच्या सभेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील गाव पाड्यांचे विद्युतीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने जिल्हा दक्षता व सनिंयत्रण समितीच्या सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. अध्यक्षा तथा खासदार डॉ.हिना गावीत यांनी वीज अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ. हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली वीर बिरसामुंडा सभागृहात संपन्न झाली.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. सिमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, दिशा समितीचे अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. गावीत म्हणाल्या, जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावामध्ये वीज, सिंचन, रस्ते, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत होणारी कामे त्वरीत पुर्ण करावीत. घरकुलात मूलभूत सुविधा देण्यात याव्यात व कामे दजेर्दार होतील याकडे विशेष लक्ष द्यावे.नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे कामे त्वरीत पुर्ण करावे. वनपट्टाधारकांना सोलरपंप, विद्युत पुरवठा,सिचंनाची सोय त्वरीत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यानी दिल्या. ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांच्या मार्फत केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भारुड यांनी दिली.बैठकीत ग्रामीण विद्युतीकरण, प्रधानमंत्री हरघर बिजली, सोलर ऊर्जा, हर घर नल हर घर जल, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेजयल, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.