शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘भिंत’ पाडल्याचे राजकारण गाजतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या कॅबीनचे सुशोभिकरण व विस्तारीकरण करण्याच्या नावाखाली बांधकाम केलेली पक्की भिंत पाडल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या कॅबीनचे सुशोभिकरण व विस्तारीकरण करण्याच्या नावाखाली बांधकाम केलेली पक्की भिंत पाडल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे ही भिंत पाडतांना बांधकाम विभागाच्या संबधित कनिष्ठ अभियत्यांनी कुणाचीही परवाणगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोघांना कारणेदाखवा नोटीसा बजावण्यात आल्या असून कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सध्या हा विषय जिल्हा परिषदेचा चांगलाच चर्चेचा झाला आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड १५ दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर सभापतीपदांचीही निवड झाली. सभापतींना विषय समिती वाटप झालेले नसल्याने दोन सभापतींनी अद्याप दालन व पदभार घेतलेला नाही. अध्यक्ष, उपाध्यक्षांनी लागलीच पदभार स्विकारला आहे.जिल्हा परिषदेत तळ मजल्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोन सभापती यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन आहेत. पैकी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे दालन समोरासमोर आहेत. उपाध्यक्षांचे दालन लांबी व रुंदीच्या मानाने लहान आहे.अतिरिक्त जागा एका भिंतीमुळे अडविली गेली आहे. त्यामुळे अडचणी येतात. ही बाब नवनियुक्त उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्या लक्षात आली. त्यांनी यावर काही तोडगा काढता येवू शकतो का? याची चाचपणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. संबधित अधिकारी यांनी दालनाचे विस्तारीकरण करावयाचे असल्यास भिंत पाडावी लागेल असा सल्ला दिला. त्याला रघुवंशी यांनी सहमती दिली नाही. परंतु रघुवंशी यांचे काही कार्यकर्ते आणि कनिष्ठ अभियंता यांनी परस्पर भिंत पाडण्याचा निर्णय घेतला.संबधित भिंत पाडली गेल्यानंतर अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे काहींनी तक्रारी केल्या. त्यामुळे लागलीच चौकशीचे आदेश देण्यात आले.चौकशीत भिंत पाडण्यासंदर्भात कुठलीही परवाणगी घेतली गेली नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे सुशोभिकरणाचे आणि विस्तारीकरणाचे काम जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्यात आले. कार्यकारी अभियंता दिलीप चौधरी यांनी संबधित दोन्ही कनिष्ठ अभियंते पी.ए.पाटील व जगदाळे यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. त्यांच्या उत्तरानंतर कारवाई संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेत सध्या या विषयाची चर्चा रंगली आहे. कुठल्याही पदाधिकाºयाचे दालन सुशोभिकरण करावयाचे असल्यास त्यासाठी स्थायी समिती व सर्वसाधारण समितीमध्ये मंजुरी घ्यावी लागत असते. त्याचा खर्च किती येऊ शकतो याचा अंदाज घेवून खर्चाचे प्रावधान करावे लागते. त्यानंतरच सुशोभिकरण किंवा विस्तारीकरणाचे काम केले जाते अशी प्रक्रिया असल्याचे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम दहा वर्षांपूर्वी झाले आहे. संपुर्ण इमारत ही आरसीसी पद्धतीची आहे. त्यामुळे कॉलमला धक्का न लावता भिंत काढल्यास स्ट्रक्चरवर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे दालनाची पाडलेली भिंतीमुळे मोठे नुकसान झाले असा समज चुकीचा आहे. यापूर्वीही आवश्यक त्या ठिकाणी भिंती पाडल्या व बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे या भिंतीचे एवढे राजकारण आणि बाऊ करण्याचे कारण नाही असेही एका वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले.