शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

३२ हजार रोख व चांदीचे दागिने असलेली बॅग पोलिसाने केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : खाकीच्या धाकाची अथवा तो ओसरण्याची बाब नेहमीच चर्चीली जाते. परंतु या खाकीतही माणुसकी असते ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : खाकीच्या धाकाची अथवा तो ओसरण्याची बाब नेहमीच चर्चीली जाते. परंतु या खाकीतही माणुसकी असते हे वेळोवेळी घडलेल्या घटनांवरून सिद्ध झाले आहेच. अशीच एक आदर्शवत घटना शहादा येथे घडली. ३२ हजार रुपये रोख आणि चांदीचे दागीने असलेली बॅग पोलीस कर्मचाऱ्याला सापडली, आणि त्यांनी ती संबधित व्यक्तीपर्यंत पोहचविली.म्हसावद, ता. शहादा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार भगवान धात्रक यांना ३१ रोजी शहादा बसस्थानकासमोरील जवाहर स्टोअर्स जवळ बेवारस बॅग आढळली. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला परंतु कोणीही आढळून आले नाही. या बॅगेत ८० भार वजन असलेले दोन चांदीचे कडे व २०० रुपयांचा ९९ नोटा, ५०० रुपयांचा २५ नोटा असे एकुण ३२ हजार ३०० रुपये रोख आणि इतर ऐवज मिळून आला. सदर बॅगेचा मालकाची ओळख पटावी म्हणून पोलीस भगवान धात्रक यांनी शोधाशोध केली असता बॅगेत मालकाचे आधार कार्ड मिळाले. सदर व्यक्ती हा धडगाव तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी असल्याचे तपासात आढळून आले. पोलीस धात्रक यांनी उमराणे येथील पोलीस पाटील दिलीप पावरा यांच्याशी संपर्क साधून सदर इसम हा तोच आहे याची खात्री झाली.पोलीस पाटील यांनी बागेचे मालक कांद्या शेवल्या पावरा उमराणी, ता.धडगाव यांना शहादा येथे पोलीस उपविभागीय कार्यालयात पाठविले. उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या उपस्थितीत पावरा यांना बॅग देण्यात आली. शिवाय हवालदार धात्रक यांचेही कौतूक केले. यावेळी म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आणि शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी कांद्या पावरा यांनी पोलिसांचे आभार मानले.