शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

सुरतजवळ नकली रेमडेसिविर इंजेक्शनचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

नंदुरबार : सुरतजवळील पिंजरज, ता. ओलपाड (गुजरात) येथील एका फार्महाऊसवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नकली रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आढळून आला. ...

नंदुरबार : सुरतजवळील पिंजरज, ता. ओलपाड (गुजरात) येथील एका फार्महाऊसवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नकली रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आढळून आला. याच ठिकाणी हे नकली इंजेक्शन बनवीत असल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी मुख्य आरोपीसह साठा व इंजेक्शन बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे.

गुजरातमधील सुरत, बडोदा परिसरात नकली इंजेक्शन विक्री होत असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सुरत क्राईम ब्रॅंचने गुप्त तपास सुरू केला होता. त्यानुसार सुरतमधीलच वराछा परिसरात जयदेवसिंग झाला नावाचा व्यापारी इंजेक्शन विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने १२६ इंजेक्शन विक्री केल्याचे सांगून हे इंजेक्शन त्याने ओलपाड येथील कौशल वोराणी यांच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पिंजरज येथील कौशल वोराणी याच्या रायल बंगला या फार्महाऊसवर छापा टाकला असता तेथे बनवाट इंजेक्शन तयार होत असल्याचे आढळून आले. ग्लुकोज आणि मिठाचे पाणी मिश्रित करून हे इंजेक्शन बनविले जात होते. त्यासाठी त्यांनी मुंबईहून नकली रेमडेसिविर उत्पादनासंदर्भातील कागदपत्रांची प्रिटिंग केली होती. त्यांच्याजवळून जवळपास इंजेक्शनचा ४०० पेक्षा अधिक बॅाक्स आढळून आले. त्यात सुमारे सहा हजार नकली इंजेक्शन असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी सर्व साहित्यासह कौशल वोराणी यास ताब्यात घेतले आहे.