शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पोलिसांनी केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

शहादा : काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यात येत असलेला तांदूळ पोलिसांनी ताब्यात घेत सातजणांवर कारवाई केली. यादरम्यान पोलिसांनी ९ ...

शहादा : काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यात येत असलेला तांदूळ पोलिसांनी ताब्यात घेत सातजणांवर कारवाई केली. यादरम्यान पोलिसांनी ९ लाख रुपयांचा मुद्देमालही ताब्यात घेतला. एक मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

शहादा तालुक्यातील पाडळदा परिसरातील स्वस्त धान्य दुकानातून रेशनिंगचा तांदूळ हा तळोदाकडे जाणार असल्याची माहिती शहादा पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर शहादाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे व शहादाचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी ३० एप्रिलपासून पाडळदा ते भादा रस्त्यावरील पिंगाने गावालगत पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. दरम्यान, १ मे रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पाडळदा चौफुलीकडून पिंगाने पुलावरून एमएच ३९ डब्ल्यू ०१९४ हा मालवाहू येत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिसून आले. त्यांनी ते वाहन थांबवून विचारपूस केली असता वाहनातील एका युवकाने पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून वादावादी करण्यास सुरुवात केली. यात भर म्हणून पोलीस कर्मचारी वाहन सोडत नसल्याची माहिती तळोदा तालुक्यातील काहीजणांना फोनद्वारे देत बोलावूनही घेतले. काही वेळाने पाच ते सातजण याठिकाणी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करून त्यांच्या हाताला दुखापत केलेली आहे.

गैरमार्गाने तांदूळ घेऊन जाणारी व्यक्ती पोलीस प्रशासनाच्या सूचना न ऐकता दादागिरी करून तो तांदूळ नेण्याच्या प्रयत्न करीत होती. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांनी दीपक बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ यांच्याशी संपर्क करत कुमक मागवून घेतली. दरम्यान, तांदूळ वाहून नेणारे वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एमएच ३९ डी २१२२ हे चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. वाहनासोबत तांदूळही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

शहादाचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केल्याची माहिती दिली आहे. पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे स्वस्त धान्य दुकानातून काळ्या बाजारात नेण्यात येणाऱ्या गहू आणि तांदळाचा अवैध व्यवसाय उजेडात येणार आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी भरत पुंडलिक उगले यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दीपक मनोहर कलाल (रा. गणपती गल्ली, तळोदा), योगेश दशरथ पाटील (२४, रा. तळोदा), अशोक शनू वाडीले व सुनील अशोक वाडीले (दोघे रा. शहादा, जुनी पोस्ट गल्ली, धानका दलपूर), जगन तुकाराम सोनवणे व प्रवीण धानका (दलपूर) यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेली आहे.