शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात पोलिसाला तर नवापुरात वीज कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

नंदुरबार : संचारबंदी काळात रस्त्यावर फिरणाऱ्यास हटकून शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री ...

नंदुरबार : संचारबंदी काळात रस्त्यावर फिरणाऱ्यास हटकून शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. दरम्यान, नवापूर तालुक्यातील बिलदा गावातही वीज कंपनीच्या वायरमनला मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील सी.बी. पेट्रोलियम समोर रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दिनेश नानाभाऊ ठाकरे हा जी.जे. ०५ सीएन १८७६ हे वाहन लावून गप्पा मारत होता. संचारबंदी सुरू असल्याने उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देविदास गांगडे यांनी त्यास हटकले होते. यावरून दिनेश ठाकरे याने तू कोण मला गाडी बाजूला घ्यायला लावणारा, असे सांगून कॉन्स्टेबल गांगडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ठाकरे याने गांगडे यांच्या वर्दीची कॉलर धरून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने ठाकरे यास आवर घालण्यात आला. दरम्यान, याबाबत पोलीस कॉन्स्टेबल देविदास गांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित दिनेश ठाकरे याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे करत आहेत. संशयित दिनेश ठाकरे यास रविवारी अटक करण्यात आली होती. त्याला सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, नवापूर तालुक्यातील बिलदा येथे वीज वितरण कंपनीचे वायरमन दिलीप भागा गावित हे बिलदा या गावी गेले असता, नरेंद्र भरतसिंग गावित याने गावाचा वीजपुरवठा जास्त वेळ का बंद केला या कारणावरून त्यांच्यासोबत वाद घातला. दरम्यान, नरेंद्र गावित याने वायरमन दिलीप गावित यांची कॉलर धरून हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी वायरमन दिलीप गावित यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नरेंद्र गावित याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नासीरखाँ पठाण करत आहेत.