शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा तपासाबाबत पोलिसांचे हवेत तीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे गावात दरोडेखोरांनी ठिकठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी पोलीस यंत्रणा चोरट्यांचा कसून शोध ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे गावात दरोडेखोरांनी ठिकठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी पोलीस यंत्रणा चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. असे असले तरी अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणेपुढे चोरट्यांना पकडण्याबाबतचे आव्हान कायम आहे.मंगळवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी करून शिक्षक परिवारासह अन्य लोकांशीही चर्चा करून सखोल माहिती घेतली. चोरट्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आले आहेत.मंदाणे ग्रामस्थांना रविवारची रात्री अक्षरश: वैऱ्याची ठरली. चोरट्यांनी एकाच रात्री आठ घरांमध्ये आणि मंदीरात चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरटे यशस्वीरित्या पसार झाल्याच्या घटनेने ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण कायम आहे. सर्वाधिक २० ते २१ लाखांचा ऐवज प्राथमिक शिक्षक शशिकांत बेहेरे यांच्या घरातून लुटला गेल्याने बेहरे कुटुंबीय पूर्णपणे हादरले आहे. या घटनेतील चोरांचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक नजन पाटील व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांचे नेतृत्वाखाली स्वतंत्र तीन पथके तयार करण्यात येवून प्रत्यक्ष तपास कार्यदेखील सुरू झाले आहे. या घटनेतील दरोडेखोर नक्कीच पकडले जातील, असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी व्यक्त केला आहे.मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हा अन्वषेण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी हवालदार मुकेश तावडे, सुनील पाडवी, सतिष घुले, मोहन डमडरे, किशोर मोरे, दादाभाई मासोळे यांच्यासह घटनास्थळांची पाहणी केली. सर्वाधिक ऐवज लंपास झाल्याच्या ठिकाणी परिवारातील सदस्यांकडून दागदागीण्यांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच गावातील विश्वास बाजीराव मोरे, चिंतामण मोरे यांच्या निवासस्थानासह जैन मंदिराची पाहणी केली. तेथील लोकांकडून माहिती जाणून घेतली.मंदाणे परिसर हा असलोद पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येतो. या कार्यक्षेत्रात ३८ ते ४० गावे समाविष्ट असून, याठिकाणी फक्त तीन कर्मचारी नेमणुकीला आहेत. तेही मुख्यालयी रहात नसल्याने हे दूरक्षेत्र अक्षरश: वाºयावर आहे. या दूरक्षेत्राला लागूनच मध्यप्रदेशाकडे जाणारा मुख्य राज्यमार्ग असल्याने वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात, भुरट्या चोरट्या, अवैध मालाची वाहतुकीमुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे.मंदाणे येथील मध्यवस्तीत साखळी पद्धतीने बिनधास्तपणे चोरी करून चोरटे सहिसलामत पसार झाले. याबाबत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.