शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला बैठकीनंतर पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:19 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथील शिवसेना कार्यालय जाळल्याच्या आरोप असलेले जिल्हा परिषद सदस्य कपिलदेव चौधरी यांना शुक्रवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथील शिवसेना कार्यालय जाळल्याच्या आरोप असलेले जिल्हा परिषद सदस्य कपिलदेव चौधरी यांना शुक्रवारी जिल्हा परिषद आवारातून पोलिसांनी अटक केली. त्यांना ३ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या रात्री अक्कलकुवा येथील शिवसेनेचे कार्यालय जाळल्याचा प्रकार घडला होता. या जाळपोळीमागे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कपीलदेव चौधरी व भाजप पदाधिकाऱ्यांसह इतर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जिल्हा परिषद सदस्य कपिलदेव चौधरी हे फरार होते.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी चौधरी हे जिल्हा परिषदेत आल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाली. अक्कलकुवा पोलिसांचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाच्या मदतीने चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले.निवडीची सभा संपल्यानंतर सर्व सदस्य बाहेर येत असतांनाच चौधरी यांना पोलिसांनी घेरून त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून थेट अक्कलकुवा येथे नेण्यात आले. याबाबत प्रचंड गोपनियता पाळण्यात आली होती. शनिवारी त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.