शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

पिंगाने गावाजवळ पोलिसांची कारवाई; नऊ लाख सात हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

यासंदर्भात शहादा पोलिसात भरत पुंडलिक उगले (३०) या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद नोंदवून सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात ...

यासंदर्भात शहादा पोलिसात भरत पुंडलिक उगले (३०) या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद नोंदवून सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात दीपक मनोहर कलाल (रा. गणपती गल्ली तळोदा), योगेश दशरथ पाटील (२४, रा. तळोदा), अशोक शनू वाडीले व सुनील अशोक वाडीले (दोघे रा. शहादा जुनी पोस्ट गल्ली, धानका दलपूर), जगन तुकाराम सोनवणे व प्रवीण धानका (दलपूर) हे संशयित आरोपी आहेत. फिर्यादी भरत उगले यांनी वाहन थांबवून जगन सोनवणे यास ताब्यात घेऊन वाहन कुठे नेत आहात व वाहनात काय आहे, अशी विचारपूस करीत असताना दीपक कलाल याने गैरकायद्याने पाच ते सात जण जमा करून पोलीस प्रशासनावर दडपण आणून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली आहे. यासंदर्भात शहादा पोलिसात शासकीय कामात अडथळा व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सातही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रेशनिंगचा माल जप्त केलेला आहे. पोलीस प्रशासनाकडून केलेल्या या कारवाईमुळे रेशनिंग व्यवसाय करणाऱ्या व बाजारात बेकायदेशीर धान्य विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एकीकडे कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेमुळे जनता हतबल झाली असताना राज्य शासनाने त्यांना मोफत धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील काही स्वस्त धान्य दुकानदार रेशनिंगचा तांदूळ व गहू हा काळ्या बाजारात बिनधास्त विकत आहेत. शहादा महसूल प्रशासनाकडून याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.