शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मद्य तस्करांवर पोलिसांची कारवाई

By admin | Updated: April 17, 2017 23:29 IST

अडीच लाखांचा साठा ताब्यात : दुर्गम भागात कारवाई

नंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातून गुजरात राज्यात मद्य वाहून नेणा:या तस्करांवर मोलगी पोलिसांनी पहाटे चार वाजता कारवाई केली़ या तस्करांकडून पावणे दोन लाख रुपयांचे बनावट मद्य आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारे जप्त करण्यात आले आह़े चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना अक्कलकुवा न्यायालयात हजर करण्यात आल़े  
धडगाव येथून मोलगी मार्गाने गुजरात राज्यात एका वाहनातून मद्य वाहून नेले जात असल्याची माहिती मोलगी पोलीस ठाण्याला मिळाला होती़ या माहितीनुसार पहाटे तीन वाजेच्या सुमारास मोलगी पोलीस  ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी़ज़ेराठोड, पोलीस सहायक उपनिरीक्षक डी़एस़ बागुल, पोलीस नाईक मेहेरसिंग वळवी, टी़सी़ शेमळे, राजकुमार जाधव, हेड कॉन्स्टेबल मोतीलाल घमंडे, पोलीस कॉन्स्टेबल हारसिंग पावरा यांच्या पथकाने धडगाव मोलगी रस्त्यावरील भांग्रापाणी फाटय़ावर सापळा रचला होता़ पहाटे तीन वाजून 55 मिनिटांनी धडगावकडून येणा:या जीजे 05 एसएल 9350 या चारचाकी प्रवासी वाहनाला थांबवून झडती घेतली असता, त्यात गोवा व्हिस्की या मध्य प्रदेश बनावटीच्या बोगस दारूच खोके दिसून आल़े या मद्याची किंमत एक लाख 81 हजार 820 रुपयांची  असल्याचे निष्पन्न झाल़े या बनावट मद्याबाबत वाहनचालक लक्ष्मण शेगजी वसावे रा़ देवमोगरा, ता़ सागबारा याची पथकातील कर्मचा:यांनी विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़ तर या वेळी वाहनाच्या  आत बसलेले दु:या सज्या वसावे, किसन रामा वसावे, योगेश कोथा वसावे सर्व रा़ मोरखीचा तिनसुल्यापाडा, ता़ अक्कलकुवा यांनाही विचारपूस केली असता, त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सहायक पोलीस निरीक्षक राठोड यांच्यासह पथकातील कर्मचा:यांनी तिघांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतल़े  त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली़
चारही संशयित आरोपींना अक्कलकुवा न्यायालयात हजर करण्यात आल़े न्यायालयाने त्यांना 21 एप्रिलर्पयत पोलीस कोठडी सुनावली आह़े
धडगाव व अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागातून गुजरात राज्यात मद्य तस्करीचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी होत्या़ मोलगी पोलीस ठाण्याने केलेल्या कारवाईमुळे मद्य तस्करांचे धाबे दणाणले आह़े पोलीस कॉन्स्टेबल हारसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े चौघांकडून तीन लाख 81 हजार 21 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े