शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ हरवले धुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ सध्या धुक्यात हरवले आहे़ तीन दिवसांपासून मुसळधार ...

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ सध्या धुक्यात हरवले आहे़ तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिसरातील रस्त्यांवर ढग उतरुन आल्याने धुके वाढत आहे़
एकीकडे निसर्ग सौंदर्य बहरत असताना पर्यटकांना मात्र त्याचा आनंद पाहता येणार नाही़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोरणमाळ पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात आले आहे़ दरम्यान दोन दिवसांपूर्वी आणखी एक रुग्ण आढळून आल्याने भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोरक्षनाथ मंदिरातील दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे़ पावसामुळ सिताखाई धबधब्याच्या पाण्यात वाढ होत आहे़ सोबत डोंगरदºयातील इतर धबधबेही प्रवाहित झाले आहेत़ तोरणमाळकडे जाताना दाट धुके आणि त्यात हरवलेला रस्ता असा प्रवास करणे चैतन्यदायी असल्याने अनेकांनी प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता़ परंतु राणीपूर येथूनच पर्यटकांना परत पाठवण्यात आल्याची माहिती आहे़ येत्या काही दिवसात तोरणमाळ येथील व्यवहार सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ तोरणमाळ गाव बंद असले तरी लेंगापाणी, कालापाणी या परिसरात पायी भटकंती शक्य आहे. यातून अनेक जण राणीपूर येथे मोटारसायकली लावून पावसाचा आनंद घेत फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळते.