दोन वेगवेगळ्या घटनेत नाशिक येथे दोन विवाहितांचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:26 IST2020-11-07T12:26:36+5:302020-11-07T12:26:57+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार व शहादा येथील विवाहितांचा नाशिक येथे सासरी छळ केल्याप्रकरणी नंदुरबार व शहादा ...

दोन वेगवेगळ्या घटनेत नाशिक येथे दोन विवाहितांचा छळ
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार व शहादा येथील विवाहितांचा नाशिक येथे सासरी छळ केल्याप्रकरणी नंदुरबार व शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाद्यातील घटनेतील आठ तर नंदुरबारच्या घटनेतील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील कोकणी हिल परिसरात राहणाऱ्या शालीनी भूषण वाघ या विवाहितेचा सासरी नाशिक येथे छळ केला जात होता. त्या छळाला कंटाळून त्यांनी महिला दक्षता कक्ष येथे तक्रार केली. तेथेही समझोता न झाल्याने त्यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भूषण मधूकर वाघ, सुनंदा मधुकर वाघ, मधुकर देवबा वाघ सर्व नाशिक, सुरेखा भास्कर बोरसे, भास्कर बाळू बोरसे, वैशाली अभिजीत भामरे, अभिजीत साहेबराव भामरे सर्व रा.धुळे व पल्लवी शरद भामरे, शरद साहेबराव भामरे, युवराज साहेबराव भामरे रा.सटाणा यांच्याविरुद्ध नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहे.
दुसऱ्या घटनेत शहादा येथील प्रेस मारुती मंदीर परिसरात राहणाऱ्या राधा राजेंद्र डोरे या महिलेचा सासरी छळ झाला. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावे यासाठी सासरची मंडळी छळ करीत होती. त्यांनी मागणी पुर्ण केली नाही म्हणून त्यांच्याकडील सर्व दागीने काढून घेत ठार मारण्याची धमकी देत छळ केला. त्यांनीही नंदुरबार येथे महिला दक्षता कक्षात तक्रार केली. तेथे समेट न झाल्याने फिर्याद देण्यात आली.
याबाबत राधा डोरे यांनी फिर्याद दिल्याने राजेंद्र दौलत डोरे, दौलत पांडूरंग डोरे, मिराबाई पांडूरंग डोरे सर्व रा.पंचवटी, योगिता दिनेश पवार, दिनेश धुडकू पवार, संतोष लक्ष्मण भदाणे, अनिता संतोष भदाणे रा.देवळा व प्रणव सोपान डोरे रा.नाशिक यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.