शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा -जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

शहादा तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मोहिदा गावालगत १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर ...

शहादा तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मोहिदा गावालगत १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन प्लांटदेखील उभारला जात आहे. त्याची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, जि.प.चे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, शहादा पालिकेचे गटनेते मकरंद पाटील, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, गटशिक्षण अधिकारी उषा पेंढारकर, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, तालुका विस्तार अधिकारी भरत निकम, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भारुड म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात आधीपासूनच आरोग्य व्यवस्था मजबूत नसल्याने कोविड काळात रुग्णांना उपचारासाठी आरोग्य विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार हे दोन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. सध्या जिल्ह्यात नऊ हजारापेक्षा अधिक ॲक्टीव कोरोना रुग्ण असून, एकट्या शहादा तालुक्यातील जवळपास तीन हजार रुग्ण बाधित आहेत. एवढ्या साऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने ती करणे गरजेचे झाले आहे. शहादा तालुक्‍यात ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे होते; मात्र ग्रामीण भागात वॅक्सिन पुरवठा कमी झाल्यामुळे लसीकरण होऊ शकले नाही. सव्वा ते दीड लाख लोकांचे लसीकरण होणे गरजेचे होते. त्यापैकी १९ ते २० हजार लोकांचे लसीकरण झालेले आहे, ही चिंतेची बाब आहे. लसीकरण झाल्यानंतर २१ दिवसात ह्युमॅनिटी तयार होत असते. सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामीण भागात १५ ते २० टक्के रुग्णसंख्या होती. त्यादरम्यान शहरात ८० टक्के रुग्णांची संख्या वाढली होती; मात्र या दुसऱ्या टप्प्यातील कोरोना संसर्गामुळे शहर व ग्रामीण भागात आता ४० ते ५० टक्के रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. ज्याठिकाणी जास्त पेशंट असेल तेथे रुग्णाला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात यावे. मागच्या व्हायरसपेक्षा दहा पटीने वाढ होत असल्याने रुग्णांना ताप, खोकला आढळल्यास त्यांनी त्वरित वैद्यकीय उपचार करून घ्यावा. पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात दाखल व्हावे, असेही जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी सांगितले. शहादा तालुक्यातील मोहिदा येथे १०० बेड ऑक्सिजन असलेले सेंटर लवकरच सुरू होत आहे. याठिकाणी शासकीय व खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर व नर्सेस नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. रुग्णांना मिळणारे भोजन हे उत्तम प्रतीचे दिले जाणार असून, कोविड सेंटरला दाखल झालेला रुग्ण हा घरीच उपचार घेत असल्याची त्याला जाणीव होणार आहे. प्रशासन प्रत्येक कोविड सेंटरला विशेष लक्ष नियंत्रित करणार आहे.

अभिजित पाटील म्हणाले की, शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसोबत आवश्यक असलेले औषध व इंजेक्शन पुरवठा शासनाकडून वेळोवेळी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. प्रा.मकरंद पाटील यांनी शहादा शहर व ग्रामीण भागात जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण कसे सुरू करता येईल, यासाठी केंद्र स्थापन करून लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. लस दिल्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.