शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

लोकहो... कोरोना वाढू द्यायचा की रोखायचा तुम्हीच ठरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

मनोज शेलार जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. मृत्यूंचे प्रमाणदेखील वाढले आहे. विशेष म्हणजे मृत्यू होणाऱ्यांमधील वयोगट बदलला आहे. सरासरी ...

मनोज शेलार

जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. मृत्यूंचे प्रमाणदेखील वाढले आहे. विशेष म्हणजे मृत्यू होणाऱ्यांमधील वयोगट बदलला आहे. सरासरी ४५ ते ७० या वयोगटातील व्यक्तिंचा त्यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात लहान मुलं कोरोनापासून लांब होती, परंतु गेल्या काही दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये ६ ते १८ वयोगटातीलही मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नंदुरबार आणि शहादा शहरातील एकही भाग यातून सुटलेला नाही की जेथे कोरोना रुग्ण नाही. सर्वच शहर कोरोनाने कवेत घेतल्याचे चित्र आहे. या सर्व बाबी पाहता कोरोनाची ही दुसरी लाट आणखी वाढू न देण्यासाठी सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारी नियमांचे, कायद्यांचे आणि प्रतिबंधांचे पालन करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट बऱ्यापैकी थोपवून धरण्यात शासन, प्रशासनाला यश आले होते. मार्च ते मे दरम्यान अगदीच तुरळक कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळून येत होते. त्यामुळे नंदुरबार पॅटर्नचा चांगलाच गवगवा झाला होता. नंतर मात्र जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला. शहरी भागासह थेट दुर्गम भागातील धडगाव, तोरणमाळ, मोलगीसारख्या भागात रुग्ण आढळले होते. दसरा, दिवाळीपासून २०२१सुरू होण्यापर्यंत अर्थात तीन ते चार महिने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. नंतर अर्थात फेब्रुवारी महिन्यापासून त्यात पुन्हा वाढ झाली आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंतचा सर्वाधिक रुग्णांचा उच्चांक हा मंगळवार, २४ मार्च रोजी झाला. तब्बल ६२६ रुग्ण एकाच दिवसात आढळले. याशिवाय चारपेक्षा अधिक जणांचा एकाच दिवशी मृत्यू होण्याचे प्रकारदेखील गेल्या चार दिवसात वाढले आहेत. चार दिवसात सतत चारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चार दिवसात १९ जणांचा मृत्यू होणे, ही बाब काळजीत टाकणारी आहे. मृत्यू होणाऱ्यांचा वयोगट देखील कमी कमी होत चालला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण मृत्यूंपैकी ८० टक्के मृत्यू हे ६० वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तिंचे झाले होते. परंतु, आता अर्थात गेल्या महिनाभरात सरासरी ४५ ते ६५ वर्ष वयाच्या व्यक्तिंचा मृत्यू होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक समावेश आहे. महिनाभरातील मृत्यूंच्या सरासरी टक्केवारीत या वयोगटातील व्यक्तिंची टक्केवारी ही जवळपास निम्मी आहे.

दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थेट सुरत किंवा नाशिकचा रस्ता धरावा लागत आहे. दीडशे ते २०० किलोमीटर अंतरावरील या शहरांमध्ये जाण्यासाठी आवश्यक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकादेखील मिळणे जिकरीचे होत आहे. मंगळवारी तर विनवण्या करूनही शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकले नाहीत. तब्बल ५०पेक्षा अधिक रुग्णांना सुरतला जावे लागल्याचे चित्र होते. यावरूनच कोरोनाच्या भयानक परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

प्रशासनाने संपर्क साखळी तोडण्यासाठी काही उपाययोजना राबविल्या आहेत. त्यांना जनतेने साथ देेणेही आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. सायंकाळी सातनंतर संचारबंदी असली, तरी रस्त्यावर फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. बाजारात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर सक्तीने करण्याचे आवाहन करण्यात येऊनही नागरिकांकडून त्याचे पालन होत नाही. सध्या प्रशासन सक्तीने या उपाययोजना राबवत नाही. जर सक्ती केली आणि कारवाईचा बडगा उगारला तर सर्वांनाच ते गैरसोयीचे ठरेल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या उपाययोजना आणि लवकरच सुरू होणारा शनिवार व रविवारच्या जनता कर्फ्यूला सर्वांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. प्रशासनावर काठी उगारण्याची आणि कारवाईची वेळ येऊ देऊ नका. कोरोनाला जिल्ह्यात वाढू द्यायचे की रोखायचे, हे जिल्हावासियांच्या हातात आहे. त्यामुळे आपल्या वागणुकीवर सर्वकाही अवलंबून असून, काळजी घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा एवढेच आपल्या हाती आहे.