शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ठरलेल्या दरानेच पपई विक्री करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई फळाची टंचाई पाहता उत्तर भारतातील बाजारात दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यामानाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई फळाची टंचाई पाहता उत्तर भारतातील बाजारात दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यामानाने कमी भाव मिळत असल्याने पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांची संयुक्त बैठक येथे पार पडली. बैठकीत आठवड्याचा सरासरी भाव काढत १३ रुपये ५१ पैसे दर निश्चित करण्यात आला. शेतकऱ्यांनी या दरानुसारच पपईची तोडणी करावी, असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय पाटील, पपई उत्पादक संघर्ष समितीचे सदस्य भगवान पाटील, अनिल पाटील, राजू पाटील, विश्वनाथ पाटील, फुलभाई पाटील आदींसह शिरपूर, नंदुरबार, तळोदा परिसरातील शेतकरी व व्यापारी शेख नाजीम सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थानवाले, राहुलभाई राजस्थानवाले, अहमद नाजिम आदी व्यापारी प्रतिनिधींची पपईच्या दरवाढीबाबत चर्चा झाली. चर्चेअंती १३ रुपये ५१ पैसे दर निश्चित करण्यात आला. अतिवृष्टीमुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फळधारणाही किमान झाली. जिल्ह्यात पपईचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. पपई पिकावर व्हायरससह डाऊनीमुळे उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. दररोज जिल्ह्यातून पपईच्या सरासरी शंभर गाड्या जात होत्या. ती संख्या सध्या निम्म्याहून अधिक कमी झाली आहे. गेल्या आठवड्यातही संयुक्त बैठक झाली होती. त्या बैठकीत ११ रुपये ७५ पैसे भाव ठरविण्यात आला होता. परंतु उत्तर भारतातील बाजारपेठेत वाढणारा भाव पाहता संघर्ष समितीने पुन्हा पुढाकार घेत आठवड्याचा सरासरी भाव काढून शेतकºयांना भाववाढ मिळवून दिली.दरम्यान, कधी दोन रुपये तर कधी पाच रुपये प्रतीकिलो या दराने आजपर्यंत पपई उत्पादक शेतकरी पपई फळाची विक्री करीत होता. परंतु यंदा प्रथमच पपईला चांगला भाव मिळत आहे. तरीही पपई पिकावर झालेला खर्च व मिळणारे अपेक्षित उत्पादन पाहता भाव वाढ समाधानकारक नसल्याचे शेतकरी सांगतात. शेतकºयांना बाजारपेठेतील दराची माहिती नसल्याने नुकसान होते. महानगरांमध्ये ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे पपईची विक्री सुरू आहे. त्यामुळे पपईला प्रतीकिलो १५ रुपयेप्रमाणे दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. सध्या व्यापाºयांनी ठरवलेल्या दरापेक्षा खुल्या बाजारात १५ रुपयेप्रमाणे काही व्यापारी पपई खरेदी करत असल्याचे बोलले जात आहे.