शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

ग्रामपंचायत, प्रकाशा प्रकाशा येथील ग्रामपंचायतीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी ...

ग्रामपंचायत, प्रकाशा

प्रकाशा येथील ग्रामपंचायतीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्राम विकास अधिकारी बी.जी. पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी मुकुंद पंडित, संजय पाडवी, विजय चित्ते, राहुल पाटील, गोपाळ भोई, अनिल सामुद्रे, प्रकाश ठाकरे आदी उपस्थित होते.

रांझणी

रांझणी, ता.तळोदा येथे शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौकात युवकांकडून गडाची प्रतिकृती सजवण्यात आली होती. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. या वेळी दिवसभर शिवरायांच्या शौर्याची गाथा, पोवाडे सुरू होते. त्यामुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान युवकांकडून गल्लोगल्ली भगवे ध्वज लावण्यात आले होते तर गृहिणींकडून अंगणांमध्ये सडा टाकून रांगोळी काढण्यात आल्या होत्या. एकंदरीत पूर्ण गावच भगवामय झाले होते. दिवसभरातून ग्रामस्थ, युवक तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शिवराजांचे पूजन केले.

मोड

मोड, ता.तळोदा येथे आयोजित कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी कोविड १९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. कार्यक्रमास पुरुषोत्तम चव्हाण, गुलाबसिंग गिरासे, प्रवीणसिंग राजपूत, सुधीर शिंदे, राहुल राजपूत, दिनेश ठाकरे, गौरव गिरासे, तन्मय मराठे, भावेश गिरासे, सागर मराठे, नितीन शिंदे, जयेश राजपूत, महेश नवले, हर्षल राजपूत, सौरभ लोहार, गणेश नवले, दीपक पवार, आनंदा राजपूत, हर्षल शिंपी, राहुल साळवे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक वाचनालय, नंदुरबार

नंदुरबार शहरातील इंदूबाई गोसावी सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एन.बी. गोसावी होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी अजय पाडवी, रवी गिरासे, सारंग गवळी, दीपेश मिस्तरी, शुभांगिनी गोसावी, भूपेश गोसावी, झुलेश गोसावी, सभासद व वाचक उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल हेमंत कुकावलकर तर आभार देवेश तांबोळी यांनी मानले.