शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

कोठली येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, ...

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, शिक्षणाधिकारी राहुल चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी, सरपंच वासंतीबाई वळवी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहेत. कोरोना नियंत्रणासाठी

नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढत असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यासोबतच लसीकरणही करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी यावेळी केले.

लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. लोकप्रतिनिधींनी गावात लसीकरण मोहीम घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. शिबिराच्या आयोजनासाठी त्यांनी गटविकास अधिकारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी - कर्मचारी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

लसीकरणासाठी गावाने घेतलेला पुढाकार स्तुत्य असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशाच स्वरुपाचे शिबिर आयोजित करून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे गावडे म्हणाले. नंदुरबार तालुक्यात आतापर्यंत शिक्षकांच्या सहकार्याने ४५ वर्षांवरील २८ हजार नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. कोठली गावातील ५०३ ग्रामस्थांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. ग्रामस्थांचा प्रतिसाद लक्षात घेता गावात तातडीने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात लसीकरण शिबिर घेण्यासाठी लवकरच

मोबाईल टीमची सुविधादेखील करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार थोरात यांनी दिली.

शेजवे येथील बाधितांवर अलगीकरणात उपचार

जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नंदुरबार तालुक्यातील शेजवे गावाला भेट देऊन अलगीकरण कक्षातील सुविधांची माहिती घेतली. बाधित व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या आणि लक्षणे असल्यास वरिष्ठ रुग्णालयात संदर्भित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. एकही बाधित व्यक्ती घरी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

शनिवारी शेजवे गावातील ८६ व्यक्तिंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. प्रशासनाने तातडीने गावातील माध्यमिक शाळेत अलगीकरण कक्षाची सुरूवात करून ६२ बाधित व्यक्तिंना या कक्षात दाखल केले. चार व्यक्ती बाहेरगावच्या असून इतरही बाधितांना लवकरच कक्षात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील, असे थोरात यांनी सांगितले.