शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूपूर्व आढावा बैठकीत आरोग्य व रोजगारालाच प्राधान्य देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासनाने नागरिकांचे आरोग्य आणि मनरेगातून ५० हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देणे अशा दोन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनाने नागरिकांचे आरोग्य आणि मनरेगातून ५० हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देणे अशा दोन्ही पातळींवर विभाग प्रमुखांनी काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते़बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, कैलास कडलग, महेश सुधळकर आदी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.भारुड म्हणाले की, कोरोना दीर्घकाळ राहील यादृष्टीने नियोजन करावे. शासकीय रुग्णालयाची यंत्रणा अधिक परिपूर्ण करण्यावर भर द्यावा. मान्सूनपूर्व रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीची कामे करावी. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यास त्या भागातील व्यवहार तातडीने बंद करावेत. ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना रोजगार नसल्याने मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यापक नियोजन करण्यात यावे़मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नेमलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांनी आठवड्यात दोन दिवस गावाला भेट देऊन कामाचे नियोजन करावे. गाळ काढणे, सीसीटी, वनक्षेत्रात दगडी बांध आदी कामे अधिक प्रमाणात घेण्यात यावीत. मजूरांना नियमितपणे काम उपलब्ध होईल असे नियोजन करावे. पावसाळ्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशाच्या लसीच्या उपलब्धतेबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा असे सांगितले़बैठकीत मान्सूनपर्वू रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे, नवीन काम सुरु करु नये, केवळ दुरूस्तीची कामे करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी केल्या़ बैठकीस सर्व विभागप्रमुख उपस्थित होते़ प्रत्येक गावाने योजनेअंतर्गत एक मोठे काम घ्यावे यासाठी शिक्षकांची मदत घेऊन ग्रामस्थांना योजनेचे महत्व पटवून द्यावे. अक्कलकुवा आणि धडगाव या तालुक्यांमध्ये वन व कृषी विभागाने विशेष पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात किमान १०० कोटीपेक्षा अधिकची कामे होऊन ५० हजार मजूरांना रोजगार मिळेल असे प्रयत्न सर्व यंत्रणांनी मिळून करावे. मजूरी अदा करण्याच्या कामात उशिर करू नये असे आदेशही त्यांनी दिले़ कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून धान्यवाटपात गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घेऊन तसे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या़