शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विज्ञान केंद्रात जागतिक जलदिनानिमित्त ऑनलाईन चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

चर्चासत्रप्रसंगी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र डॉ. सुमंत पांडे यांनी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे किती महत्त्व आहे, पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात ...

चर्चासत्रप्रसंगी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र डॉ. सुमंत पांडे यांनी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे किती महत्त्व आहे, पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता आपण सर्वांनी जागरूक राहून पाण्याविषयी आपल्या घरी, गावात, परिसरात, पाण्याच्या संवर्धनासाठी कार्यरत असले पाहिजे असा आग्रह धरला. जलसाक्षरता केंद्र संचालक आनंद पुसावळे यांनी आपल्या मार्गदर्शनात जलसाक्षरतेचे महत्त्व सांगून समाजाच्या विविध स्तरातील लोकांपर्यंत जलसाक्षरता पोहोचविण्याची गरज प्रतिपादित केली, प्रत्येक गावाने आपल्या गावाचा पाण्याचा ताळेबंद ठेवला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कृषी अभियांत्रिकी राहुरी विभागप्रमुख विभाग, डॉ. एस. डी. गोरंटीवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, पाण्याचा कार्यक्षम वापर कशा पद्धतीने करता येईल याची जाणीव वापरकर्त्यामध्ये रुजविणे गरजेचे आहे. विभागीय विस्तार धुळे केंद्रप्रमुख डॉ. मुरलीधर महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येची वाढती अन्नाची गरज लक्षात घेता शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असल्याचे म्हणाले.

चर्चासत्र समारोप प्रसंगी १६ ते २३ मार्च दरम्यान जलसाक्षरता तालुका धडगाव समितीतर्फे जलसाक्षरता सप्ताह आयोजित करण्यात आले होते. या जलसाक्षरता सप्ताहातील विविध वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती देताना प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी सातपुड्यातील जलदूतांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. आगामी काळात जलसाक्षरता ही एक मोहीम म्हणून राबविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले. या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये शेतकरी, पाटबंधारे विभागातील जलकर्मी, तसेच मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.