शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

चार रस्त्यांवर वन-वे चे बोर्ड, अंमलबजावणी मात्र कुठेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे ...

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे राहून त्याची अंमलबजावणीचा प्रयत्न केला जातो. शहरात चार रस्त्यांवर वन वे आहे. परंतु सद्य:स्थितीत एकाही ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे.

नंदुरबारातील रस्ते आधीच अरुंद, त्यात अतिक्रमण कमालीचे वाढले आहे. वाहनांची संख्या देखील वाढल्याने रहदारीचा नेहमीच बोजवारा उडालेला आहे. अशा स्थितीत काही वर्षांपूर्वी नंदुरबारातील चार रस्त्यांवर वन वे करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी तेव्हढ्यापुरतीच मर्यादित राहत आली आहे. अशीच स्थिती समविषम पार्किंगचीदेखील आहे.

शास्त्री मार्केट रस्ता

शास्त्री मार्केट रस्त्यावर पिंजारी विहीर ते मार्केट तसेच शाळा क्रमांक एक ते मार्केट शिवाय सरळ जुने कोर्ट असा एकेरी मार्ग निश्चित करण्यात आला होता. काही काळ या ठिकाणी अंमलबजावणी झाली. परंतु हा मध्यवर्ती भाग असल्याने येथे वन वे यशस्वी झाला नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने त्याचा नाद सोडून दिल्याचे चित्र आहे.

जळका बाजार

n जळका बाजार ते सोनाट खुंट हा रस्ता देखील चार चाकी वाहनांसाठी वन वे आहे. त्यासाठीचे बोर्ड वाहतूक शाखेेने जळका बाजारात लावले देखील आहेत. परंतु या रस्त्यावर वाहतूक पोलिसांना जेंव्हा आठवण येते तेंव्हा तेथे उभे राहून केवळ दंड आकारणीसाठी अंमलबजावणी केली जाते.

साक्रीनाका

साक्रीनाका ते जळका बाजार व साक्री नाका ते धोशातकीया हा रस्ता देखील वन वे करण्यात आला होता. हे दोन्ही रस्ते अतिशय अरुंद आहेत. एकाच वेळी दोन चारचाकी वाहने निघणे म्हणजे मोठी कसरत असते. अशा वेळी या रस्त्यावर वन-वेची अंमलबजावणी होणे आवश्यक असताना त्याबाबत मात्र वाहतूक शाखेने तसेच पालिकेनेही दुर्लक्ष केले आहे.

सम-विषम पार्किंगदेखील बारगळली...

n जुनी पालिका चौक ते नेहरू चौक, तसेच पालिका चौक ते दीनदयाल चौक या दरम्यानच्या रस्त्यावर सम-विषम पार्किंग करण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात आला आहे. नवीन अधिकारी आल्यावर त्याची तेवढ्यापुरती अंमलबजावणी केली जाते. नंतर पुन्हा ते बारगळते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. शाळा, बँका, दवाखाने व इतर कार्यालये तसेच बाजाराचा परिसर असल्यामुळे वाहनधारक रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणावर आपली वाहने लावत असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा येत असतो. दोन महिन्यांपूर्वी सम-विषम पार्किंगची अंमलबजावणी सुरू झाली, परंतु आता पुन्हा ती बारगळली आहे.