कार्यक्रमात जेवण न दिल्याच्या वादातून एकाला वीट मारून केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:19+5:302021-05-21T04:31:19+5:30

नंदुरबार : कार्यक्रमात जेवण का दिले नाही, अशी विचारणा केली असता, त्याचा राग येऊन एकाला वीट मारून जखमी केल्याची ...

One was injured in a dispute over not being given food at the event | कार्यक्रमात जेवण न दिल्याच्या वादातून एकाला वीट मारून केले जखमी

कार्यक्रमात जेवण न दिल्याच्या वादातून एकाला वीट मारून केले जखमी

नंदुरबार : कार्यक्रमात जेवण का दिले नाही, अशी विचारणा केली असता, त्याचा राग येऊन एकाला वीट मारून जखमी केल्याची घटना वडफळ्या (ता. धडगाव) येथे घडली. धडगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनुसार, वडफळ्या येथील केशव गोटा पावरा यांना त्यांच्या शेजारी असलेल्या कार्यक्रमात जेवण दिले गेले नव्हते. त्याबाबत त्यांनी तेगा जहागीर पावरा यांना विचारणा केली. त्यांनी या कार्यक्रमाशी ज्यांचा संबंध आहे, त्यांना जाऊन विचार असे सांगितले. त्याचा राग आल्याने केशव पावरा याने तेगा पावरा यांना वीट फेकून मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेगा पावरा यांनी फिर्याद दिल्यानुसार केशव पावराविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार जाधव करत आहेत.

Web Title: One was injured in a dispute over not being given food at the event