लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संशय घेत एकावर दोघांनी कु:हाडीने वार करून जखमी केल्याची घटना टोकरतलाव गावात घडली. तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिपक पंडित वाघ व दिलीप रामा वळवी यांच्यात वाद झाला. संशयाच्या वादातून दिलीप रामा वळवी व चिंगा दिलीप वळवी यांनी दिपक वाघ यास टोकरतलाव गावाच्या बाहेर घेरले. तेथे त्याच्यावर कु:हाडीने वार करून त्याचे डोके फोडले. दिपक वाघ याने जीव वाचवून तेथून पळ काढला. दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अमृत भोये करीत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}