शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात एक लाख टन ऊस गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:12 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  सातपुडा साखर कारखान्याने गेल्या महिनाभरात एक लाख १४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  सातपुडा साखर कारखान्याने गेल्या महिनाभरात एक लाख १४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, प्रतिदिन चार हजार १०० मेट्रिक टन गाळप सुरू आहे. कारखाना आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी दिली.सातपुडा साखर कारखाना गेल्या ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेला आहे. शेतकरी, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या मेहनतीने चेअरमन दीपक पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुस्थितीत सुरू आहे. ऊसदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर अद्याप मोठा विश्वास असल्याची ही पावती आहे. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. उसाचे उत्पन्नही वाढले आहे. यावर्षी कारखाना पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करेल, असे ऊस नोंदीवरून दिसून येत आहे.कारखान्याने यावर्षी उसाला चांगला दर दिला आहे. प्रतिटन दोन हजार ३६५ रुपये असा दर दिला आहे. परिसरातील इतर कारखाने दोन हजार ३५० रुपये दर देत आहे. कारखान्यात ७०० कर्मचारी कार्यरत असून, साडेचार हजार ऊसतोड कामगार आहेत. ही संख्या नऊ हजारांपर्यंत जाते. ऊस वाहतुकीसाठी ४०० ट्रॅक्टरसह बैलगाड्या सुरू आहेत. कारखाना सुरू झाल्याने रोजगार मिळाला असून, परिसरात वर्दळ वाढली आहे. कोरोना महामारीमुळे सहा महिने कर्मचारी घरीच होते. आता मात्र कर्मचारी कामावर हजर झाले आहे. कोरोनाबाबत कारखाना कर्मचारी व शेतकऱ्यांची दक्षता घेत आहे.स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी १९७२ मध्ये सातपुडा साखर कारखान्याची मुहूर्तमेढ केली. तेव्हापासून साखर कारखाना अविरतपणे सुरू होता. केवळ २००१ ते २००५ या काळात कारखाना कमी पाऊस व दुष्काळामुळे बंद होता. २००५ पासून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. चेअरमन दीपक पाटील व संचालक मंडळाच्या अथक परिश्रमाने ऊस उत्पादकांचा असलेला विश्वास व पाठिंब्यामुळे कारखाना पूर्ववत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यासाठी परिसरातील सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सांगितले.