शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

रोजी गेली, तरी जिल्ह्यातील एक लाख कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST

नंदुरबार : गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय कुटुंबातील रेशनकार्डधारकांना तब्बल आठ महिने मोफत रेशन पुरवठा ...

नंदुरबार : गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय कुटुंबातील रेशनकार्डधारकांना तब्बल आठ महिने मोफत रेशन पुरवठा करण्यात आला होता. आता त्याच अनुषंगाने यावेळीही राज्य सरकारने लावलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर एक महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख चार हजार ९५३ कुटुंबांना मिळणार आहे. हे धान्य वाटपासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मात्र स्थानिक प्रशासनाने १ एप्रिलपासूनच संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने दारिद्र रेषेखालील कुटुंबांना एक महिन्याचे मोफत धान्य रेशन दुकानातून पुरविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन सुरू आहे. लवकरच रेशन दुकानदारांना हे धान्य पुरविण्यात येणार असून त्यांच्या मार्फत लाभार्थी कुटुंबांना ते पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अशा कुटुंबांना एक आधार मिळणार आहे.

गहू व तांदूळ मिळणार

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लाभार्थी कुटुंबांना गहू व तांदूळ मिळणार आहे. त्या अनुषंगाने रेशन दुकानदारांना लाभार्थी संख्येप्रमाणे धान्याचा कोटा दिला जाणार आहे.

n कोरोनाच्या आठ महिन्यांच्या काळात अर्थात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधीत शासनातर्फे मोफत गहू व तांदूळ वाटप करण्यात आले. यामुळे अनेक कुटुंबांची गैरसोय दूर झाली होती.

nजिल्ह्यात दोन लाख ३६ हजार ५०१ कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला होता. त्यांना दोन लाख ७० हजार १३६ क्विंटल तांदूळ तर एक लाख ८० हजार ४०० क्विंटल गहू वाटप झाला.

कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे कडक उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या उपाययोजनांच्या आधारे संचारबंदी लागू केली असून ते योग्यच आहे. ते करतांना शासनाने आमच्या सारख्या कुटुंबांचीही काळजी केल्याने तो एक आधार मिळाला आहे.

-एक लाभार्थी कुटुंब प्रमुख, नंदुरबार.

कोरोनामुळे अनेकांची रोजीरोटी गेली आहे. गेल्या वर्षी शासनाने मोफत धान्याचा आधार दिला होता. साधारणत: आठ महिने मोफत धान्य मिळत होते. आता देखील राज्य शासनाने अशा कुटुंबांची काळजी घेतली असल्याने समाधानाची बाब आहे.

-एक लाभार्थी, शहादा.