शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसानंतर सीसीआयकडून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीसाठी खेडा खरेदीकडे धाव घेत होता तर दुसरीकडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीसाठी खेडा खरेदीकडे धाव घेत होता तर दुसरीकडी सीसीसायची खरेदी १५ दिवसांपासून बंद होती. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता नंदुरबार बाजार समितीने सीसीआयकडे पाठपुरावा करून पुन्हा खरेदी केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी भाव देखील ५,२५० ते ५,४५० मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.नंदुरबार बाजार समितीतर्फे खाजगी व्यापारी आणि सीसीआयकडून कापूस खरेदी केली जाते. यंदा डिसेंबर महिन्यापासून हे केंद्र सुरू करण्यात आले होते. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने कापूस उत्पादन देखील चांगले आले. परिणामी अजूनही कापूस विक्रीसाठी येत आहे. परंतु १५ दिवसांपासून सीसीआयने कापूस खरेदी अचानक बंद केली होती. परिणामी शेतकऱ्यांना खाजगी व्यापाºयांकडे कापूस विक्री करावा लागत होता. त्यात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी सीसीसायच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठपुरावा करून आणखी काही दिवस सीसीआयची कापूस खरेदी सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीवरून सीसीआयने पुन्हा कापूस खरेदीला सुुरुवात केली आहे.पहिल्याच दिवशी २०० वाहनेसीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात करताच पहिल्याच दिवशी तब्बल २०० वाहने खरेदी केंद्रात दाखल झाली. सर्व वाहनांमधील कापसाची खरेदी करण्यात आली. यापुढे दररोज किमान ५० ते ६० वाहनांमधीलच कापूस खरेदी केला जाणार असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले आहे. सीसीआयच्या अटी व शर्ती कायम राहणार आहेत. चांगल्याच चांगल्या कापसाला जास्तीत जास्त भाव देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान देखील व्यक्त होत आहे. कमीत कमी ५,२५० ते ५,४५० रुपये भाव सध्या या ठिकाणी मिळत आहे. कापूस खरेदी शुभारंभाच्या वेळी सभापती किशोर पाटील, सचिव योगेश अमृतकर, सीसीआयचे केंद्रप्रमुख आदित्य वामन, पंकज झाडे यांच्यासह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.खेडा खरेदीत फसवणूकअद्यापही शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस पडून आहे. मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत होते. परिणामी मिळेल त्या भावात कापूस विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल होता. त्यातच सीसीआयची खरेदी बंद होती. परिणामी खाजगी व्यापारी खेडा खरेदीतून शेतकºयांना अगदी कमी भाव दिला जात होता. शिवाय वजन देखील सदोष राहत होते. परिणामी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला. अद्यापही गावोगावी अनेक शेतकरी आर्थिक फटका सहन करून खेडा खरेदीत कापूस विक्री करीत आहेत.बाजार समितीचे आवाहनसीसीआयने कापूस खरेदी सुरू केली असली तरी कापूस ठेवण्याासाठीची जागा, मणुष्यबळ लक्षात घेता दररोज किमान ५० ते ६० वाहनांमधील कापूस लिलाव होणार आहे. यामुळे शेतकºयांनी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.