अनरदजवळ कार अपघातात लोणखेडा येथील एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:29 IST2020-05-22T12:29:11+5:302020-05-22T12:29:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा-दोंडाईचा रस्त्यावर अनरद येथील माध्यमिक विद्यालयाजवळ कारचे चारही टायर फुटून झालेल्या अपघातात पिता ठार ...

One killed in a car accident near Lonkheda | अनरदजवळ कार अपघातात लोणखेडा येथील एक ठार

अनरदजवळ कार अपघातात लोणखेडा येथील एक ठार


लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा-दोंडाईचा रस्त्यावर अनरद येथील माध्यमिक विद्यालयाजवळ कारचे चारही टायर फुटून झालेल्या अपघातात पिता ठार तर पुत्र जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत वृत्त असे की, लोणखेडा येथील विजय विठ्ठल चौधरी (५८) हे दोंडाईचा येथे इलेक्ट्रीक सामान खरेदीसाठी कारने गेले होते. दोंडाईचाहून परत जाताना अनरद येथील माध्यमिक विद्यालयाजवळ त्यांच्या कारचे (क्रमांक एम.एच.३९ एबी- २६२२) चारही टायर अचानक फुटून अपघात झाला. त्यात विजय चौधरी हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे व सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलवून चौधरी यांना शहादा पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात चौधरी यांच्या मुलालाही दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघाताची खबर अनरदचे पोलीस पाटील दिनेश शिवाजी पाटील यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिल्याने नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश दाभाडे हे करीत आहेत.


 

Web Title: One killed in a car accident near Lonkheda